नागपूर ग्रामीणच्या सिमा अख्तरने आंतरराष्ट्रीय स्तरावरील एशिया मास्टर ॲथलेटीक्स चैम्पियनशिप २०२३ स्पर्धेत तिहेरी सुवर्णपदक जिंकले

नागपूर :- ग्रामीण पोलीस दलातील धावपटु महिला सहायक फौजदार सिमा नकीब अख्तर होने आंतरराष्ट्रीय स्तरावरील २२ व्या एशिया मास्टर्स अॅथलेटीक्स चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनीधीत्व करून दिनांक ०८/११/२०२३ ते दिनांक २२/११/२०२३ पर्यंत न्यु क्लार्क सिटी कैंपस टारक फिलीपाइन्स येथे आयोजित झालेल्या आशियाई खेळामध्ये ३५ वयोगटात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत सलग तिन सुवर्ण पदक पटकावून देशाला गौरवांन्वीत केले.

सिमा हिने ४०० मीटर अडथळा शर्यतीत प्रथम क्रमांक प्राप्त करून सुवर्णपदक जिंकले तसेच तिने २००० मीटर स्टीपलचेस मध्ये सहभागी होवुन सुवर्णपदक प्राप्त केले. तिची मजल इथेच थांबली नाही तिने यात्र स्पर्धेत १० किमी धावण्याच्या शर्यतीत सहभाग घेवुन यामध्येही प्रथम क्रमांक अर्जित करून सुवर्णपदक पटकाविले. सिमा हिच्या या अतुलनीय कामगिरीने देशाचा गौरव तर राखलाच शिवाय महाराष्ट्र पोलीस दलाचा बहुमान वाढविला. सिमा ही नागपूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहे तिने नेहमीच पोलीस दलातील अतिशय व्यस्त व धावपळीचे आपले दैनंदिन कर्तव्य सांभाळुन आपला खेळण्याचा छंद कायम जोपासला आहे. खेळाप्रती तिची मेहनत व जिद्द पाहुन नागपूर ग्रामीण पोलीस दलातील सर्वांना तिचा सार्थ अभिमान वाटत आहे.

सिमा हिने मिळविलेल्या यश पाहता नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से) यांच्या हस्ते सिमा अख्तर यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. सहायक फौजदार सिमा नकीब अखतर ही २००७ पासून पोलीस विभागात कार्यरत असुन सीमा हिने फेब्रुवारी २००८ मध्ये फेडरेशन नॅशनल क्रॉस कंट्री गेम्स नागपूर ४ किमी मध्ये कास्यपदक जिंकले तसेच २००९ मध्ये चेन्नई मध्ये कमांडोचे प्रशिक्षण घेतले. बिहारमधील छपरा येथे फेडरेशन नॅशनल क्रॉस कंट्री फेब्रुवारी २०१३ मध्ये ०८ किमी शर्यतीत महाराष्ट्र संघ रौप्यपदक तसेच पटणा येथे अखिल भारतीय पोलीस खेळामध्ये ३००० मीटर स्टीपलचेस मध्ये रौप्य पदक पटकाविले. तिच्या या कामगिरीची दखल घेवून सन २०१५ मध्ये तिला महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांचे कडुन सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. नॅशनल मास्टर्स अॅथलेटीक्स गेम्स चेन्नई एप्रिल २०२२ मध्ये ५००० मीटर धावणे शर्यतीत रौप्यपदक पटकाविले.

वुमेन्स नॅशनल मास्टर्स अॅथलेटीक्स गेम्स २०२२ मध्ये १५०० मीटर मध्ये सुवर्णपदक जिंकले, नॅशनल मास्टर्स अॅथलेटीक्स गेम्स कोलकत्ता २०२३ मध्ये १५०० मीटर मध्ये कास्यपदक, ४०० मीटर अडथळा मध्ये रौप्य पदक, २००० मोटर स्ट्रीपलचेस मध्ये रौप्य पदक प्राप्त झाले. अंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये सलग तिन सुवर्णपदक पटकाविणारी महाराष्ट्र पोलीस दलातील पहिली महिला खेळाडू म्हणून सिमा हिने बहुमान मिळविला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मंत्रिमंडळ बैठक : शुक्रवार, दि.17 नोव्हेंबर 2023 एकूण निर्णय - 5

Fri Nov 17 , 2023
उच्च व तंत्रशिक्षण विभाग राज्यातील शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता आता राज्यातील शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठ स्थापण्याकरिता मार्गदर्शक तत्त्वांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे विद्यापीठांवरील भारही कमी होऊन शैक्षणिक संस्थांचे एक शक्तीशाली जाळे तयार होऊन विद्यार्थ्यांना अधिक संधी प्राप्त होतील. राज्यपाल हे कुलपती या नात्याने या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com