नागपूर :-पोलीस स्टेशन कुही येथील स्टाफ यांना गोपनिय मुखबीरद्वारे माहीती मिळाली की, बोलेरो पिकअप वाहन क्र. MH-32/Q-6554 वाहना मध्ये अवैधरित्या प्राणी डांबून गोवंश जातीचे जनावरे कत्तलीकरीता मौजा हळदगाव येथुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या माहिती वरून दि. ०८/०२/२०२४ रोजी चे ०२/०० वा. पोलीस स्टेशन कुही येवील स्टाफ व पोलीस अधिक्षक यांचे विशेष पथक हे शासकीय वाहनाने मौजा हळदगाव फाटा येथे नाकाबंदी करीत असता मौजा हळदगाव येथुन हळदगाव फाटा येथे येणारी एक चार चाकी बोलेरो पिकअप वाहन क्र. MH-32/Q-6554 येतांना दिसून आले. वाहन चालकास थांबण्याचा इशारा केला असता बोलेरो पिकअप वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन रोडच्या बाजुला उभे करून पळून गेला. त्यांचा पाठलाग केला असता अंधाराचा फायदा घेवुन तो जंगलामध्ये पळून गेला. सदर चार चाकी बोलेरो पिकअपची पाहणी केली असता बोलेरो पिकअप मागील डाल्यामध्ये एकुण १२ जनावरे त्याचे पाय व तोंड दोरीने बांधुन असलेल्या अवस्थेत जनावरांना हालचाल न करता कोंबुन ठेवलेल्या अवस्थेत वाहतुक करीत असल्याचे मिळुन आल्याने आरोपीच्या ताब्यातून काळया रंगाची एक गाय, पांढऱ्या रंगाच्या तिन गायी, व लाल रंगाची एक गाय प्रत्येकी २०,०००/-रूपये प्रमाणे किंमती १,००,०००/- रूपये तसेच काळया रंगाचे गोरे तीन किंमती १५,०००/- रूपये प्रमाणे ४५,०००/-रूपये, तिन पांढऱ्या रंगाचे गोरे प्रत्येकी १५,०००/-रूपये प्रमाणे किंमती ४५,०००/-रूपये, एक लाल रंगाचा छोटा बछड़ा किंमती ५,०००/- रूपये असे एकुण १२ जनावरे एकुण किंमती १,९५,०००/-रूपये व बोलेरो पिकअप वाहन क्र. MH-32/Q-6554 किंमती ७,००,०००/- रूपये असा एकुण ८,९५,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून जप्त केलेले १२ गोवंश जातीचे जनावरे यांना सुरक्षे करीता व त्यांना चारा पाण्याची व औषधोपचाराची व्यवस्था होणे करीता उज्वला गोरक्षण ट्रस्ट बहादूरा नागपूर येथे दाखल करण्यात आले. आरोपी चार बाकी बोलेरो पिकअप वाहन क्र. MH-32/Q-6554 चा फरार चालक याचे विरूद्ध पोस्टे कुही येथे कलम ११(१), (घ), (ड), (च) प्राणी निर्दयतेने वागणुक प्रति. अधि. १९६० सहकलम ५ (अ), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अचि, प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.