नागपूर :- संपूर्ण नागपूर (ग्रामीण) जिल्हयातील पोलीस स्टेशन निहाय अवैधरीत्या दारु विकीबाबत केलेल्या कार्यवाहीचा आढावा नागपूर (ग्रामीण), पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार यांनी घेतला असता यामध्ये एकूण दिनांक १५/०२/२०२४ रोजी एकूण १० केसेस अवैधरीत्या दारुची विक्री करणाऱ्या गुन्हेगारां विरुध्द दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये एकूण १० आरोपीतांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. यात आतापर्यंत ७०७०/- रु. वा माल जप्त करुन १२९६० मिली लिटर देशी दारु, ३५ लिटर मोहाफुल दारु कार्यवाहीमध्ये जप्त करण्यात आलेली आहेत.
पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार यांनी अवैधरीत्या दारुची विक्री करणाऱ्या विरुध्द प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत सतर्कपणे पेट्रोलिंग व नाकाबंदी करुन कडक कार्यवाही करण्याबाबत सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार यांना आदेश देण्यात आलेले आहेत.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन येथील ठाणेदार पोस्टे जलालखेडा, केळवद, रामटेक, खापरखेडा, काटोल, नरखेड, कन्हान व त्यांचा स्टाफ यांनी पार पाडली.