नागपूर ग्रामीण जिल्हयाची अवैध जुगार धंदयाविरुद्ध विशेष मोहीम

नागपूर :- पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांनी दिनांक ०१/०७/२०२३ ते दिनांक ३१/०७/२०२३ पर्यंत यशस्वी जुगार मोहीम पार पाडली. नागपूर ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक यांनी नागपूर ग्रामीण जिल्हयातील सर्व ठाणेदार यांना अवैध जुगारावर आळा बसविण्याकरीता विशेष मोहीमेचे आयोजन केले होते. या विशेष मोहीमे दरम्यान नागपूर ग्रामीण जिल्हयातील पोलीस स्टेशन अंतर्गत एकुण २४१ जुगार कायदयान्वये गुन्हे नोंद करून एकुण ३९९ आरोपीतांविरूद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडुन नगदी ७,५०,४८९/-रु. २९ विविध कंपन्याचे मोबाईल २७ दुचाकी वाहने, ०२ चारचाकी वाहने व इतर साहित्य असा एकूण २७,९९,४७३/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरच्या मोहीमेमुळे नागपूर ग्रामीण जिल्हयात अवैध जुगार खेळणाऱ्यांचे धाबे दणाणले असून पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण विशाल आनंद यांनी अशाच प्रकारे अवैध धंदयावर वेगवेगळया प्रकारचे मोहीम राबवुन अवैध धंदयाचे समुळ नष्ट करण्याची घोषणा केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरुद्ध गुन्हा नोंद, एकूण २४९००००/- रू. चा मुद्देमाल जप्त

Sun Aug 6 , 2023
– पोलीस स्टेशन सावनेरची कारवाई सावनेर :- दिनांक ०५/०८/२०२३ रोजी सकाळी ०७.०० वा. दरम्यान पोलीस स्टेशन सावनेर येथील स्टाफ पो.स्टे. सावनेर हद्दीत पेट्रोलिंग करीत असता काही इसम पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत खापा ते पाटनसावंगी रोडने अवैध जनावरे घेवुन येत आहे अशी गुप्त बातमीदारांकडुन माहीती मिळाल्याने रेल्वे क्रॉसिंग जवळ नाकाबंदी केली असता १) आयसर क्र. एम. एच. ४० / सी.डी.- २४२० […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com