नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धा- २०२३ समारोप

नागपूर :- नागपूर (ग्रामीण) पोलीस मुख्यालय, टेका नाका येथील कवायत मैदानावर नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धा- २०२३ चे दिनांक रविवार ०८ / १० / २०२३ रोजी समारोप समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र, नागपूर डॉ. छेरिंग दोरजे (भा.पो.से) व प्रमुख उपस्थिती म्हणुन पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र संदिप पाटील (भा.पो.से) यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से), पोलिस अधीक्षक चंद्रपुर, रविंद्र परदेशी (भा.पो.से), पोलिस अधीक्षक भंडारा लोहित मतानी (भा.पो.से), पोलिस अधीक्षक वर्धा  नुरूल हसन (भा.पो.से), पोलिस अधीक्षक गडचिरोली निलोत्पल (भा.पो.से), पोलिस अधीक्षक गोंदीया  निखील पिंगळे (भा.पो.से), अपर पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण डॉ. संदिप पखाले, उपविभागीय पोलिस अधिकारी कन्हान विभाग, सावनेर विभाग, काटोल विभाग, नागपूर विभाग, उमरेड विभाग, ठाणेदार नागपूर ग्रामीण यांची उपस्थिती होती.

पोलिस मुख्यालय नागपूर ग्रामीणचे राखीव पोलिस निरीक्षक  प्रतिभा भरोसे यांच्या मार्गदर्शनात राखीव पोलिस उपनिरीक्षक  सुनिल ताकसांडे व ६ जिल्हयातील पोलिस खेळाडु यांनी पथसंचलन करून मानवंदना दिली. पुढील वर्षी होणाऱ्या परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धा सन २०२४ मे आयोजन जिल्हा गोंदिया येथे नियोजित आहे. नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धा २०२३ मध्ये नागपूर ग्रामीण, चंद्रपुर, भंडारा, वर्धा, गोंदिया, गडचिरोली जिल्हयातील पोलिस खेळाडूंनी यामध्ये विविध खेळात सहभाग घेतला.

या क्रिडा स्पर्धेतील पुरुषाचे सांघिक विजेतेपद चंद्रपूर संघाने तर महिला मध्ये चंद्रपूर विभागाने पटकावला, तर वैयक्तिक क्रिडा स्पर्धामध्ये उत्कृष्ट अॅथलेटीकचा किताब पुरूषामध्ये नाजुक मुहले जिल्हा गडचिरोली तर महिला मध्ये सुनैना डोंगरे जिल्हा वर्धा यांनी पटकाविला. महिला व पुरुषांचे १०० मीटर धावण्याची स्पर्धा मध्ये पुरुषामध्ये अमित मस्के, (प्रथम), पंकज परतेती (द्वितीय) जिल्हा नागपूर ग्रामीण महिलांचे १०० मीटर धावण्याची स्पर्धा मध्ये सुनैना डोंगरे (प्रथम), जिल्हा वर्मा, अनिता शहारे (द्वितीय) जिल्हा गडचिरोली ने पटकाविला.

क्रिडा स्पर्धेतील विजेते :- सांघीक क्रिडा प्रकार हॉकी मध्ये प्रथम स्थान वर्धा जिल्हा, द्वितीय चंद्रपूर जिल्हा, फुटबॉल मध्ये प्रथम स्थान नागपूर ग्रामीण द्वितीय स्थान चंद्रपूर जिल्हा, हँडबॉल प्रथम स्थान भंडारा जिल्हा, द्वितीय स्थान वर्धा, व्हॉलीबॉल पुरुषांमध्ये प्रथम स्थान वर्धा जिल्हा, द्वितीय स्थान गोंदीया, व्हॉलीबॉल महिला मध्ये प्रथम स्थान गोंदीया जिल्हा, द्वितीय स्थान चंद्रपूर, बास्केटबॉल पुरूषामध्ये प्रथम स्थान चंद्रपूर, द्वितीय स्थान वर्धा, वास्केटबॉल महिला मध्ये प्रथम स्थान भंडारा, द्वितीय स्थान गडचिरोली, खो खो पुरूषामध्ये प्रथम स्थान वर्धा जिल्हा, द्वितीय स्थान गडचिरोली, खो खो महिला मध्ये प्रथम गडचिरोली, द्वितीय चंद्रपूर, कबड्डी पुरुषामध्ये प्रथम स्थान नागपूर ग्रामीण, द्वितीय स्थान चंद्रपूर, कबड्डी महिला मध्ये प्रथम स्थान वर्धा, द्वितीय नागपूर ग्रामीणने पटकाविला..

या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोदार (भा.पो.से), अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान विभाग पुंडलिक भटकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग अजय चांदखेडे, उपविभागीय पोलीस अधिकारी काटोल विभाग बापू रोहम, उपविभागीय पोलीस अधिकारी नागपूर विभाग पूजा गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरेड विभाग राजा पवार, परीविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक राहुल झालटे, पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, राखीव पोलीस निरीक्षक प्रतिभा भरोसे, सहायक पोलीस निरीक्षक शुभांगी वाझे, पोलीस उपनिरीक्षक भारत थिटे, कुमुदीनी पाथोडे, कलेगुरवार, राखीव पोलिस उपनिरीक्षक सुनिल ताकसांडे, प्रधान व इतर अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सुखा मोहफुल आणि गुड ची मोहफूल सडवा रसायन तयार करण्यासाठी वाहतुक करणाऱ्या आरोपीला अटक

Mon Oct 9 , 2023
स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही रामटेक :- पो.स्टे. रामटेक हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना विश्वसनिय गुप्त बातमीदार मार्फत प्राप्त माहितीनुसार सोनालीका कंपणीचे ट्रॅक्टर संलग्न ट्रॉली मध्ये सुखा मौहफूल व गुड़ हा मोहफूल सडवा रसायन तयार करण्यासाठी वाहतूक करून नेत आहे. या खबरेवरून नगरधन किल्ला येथे नाकाबंदी करून ट्रॉली क्रमांक नसलेलीचा चालकाला थांबवुन त्याचे नाव व पत्ता विचारले असता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com