आज सकाळी नागपुरातील ऑरेंजसिटी बाईकरायडर या संस्थेचे काही युवक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्यांच्या दर्शनासाठी रवाना झाले, गांधीगेट परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्र येऊन शिवछत्रपतींच्या नावाचा जयघोष करीत सकाळच्या वातावरणात हा परिसर या बाईकरायडर व त्यांचे परिचित तसेच मनसेचे पदाधिकारी यांनी दुमदुमून टाकला, मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी व शहर अध्यक्ष विशाल बडगे हे याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते , त्यांनी भगवा ध्वज दाखविल्यावर हे सर्व बाईकरायडर रवाना झाले, यावेळी मनसेचे दक्षिण विभाग अध्यक्ष गौरव पुरी,दक्षिण पश्चिम चे विभाग अध्यक्ष तुषार गिर्हे, विभाग उपाध्यक्ष व उत्कृष्ट रायडर चेतन बोरकुटे, दक्षिण विभाग सचिव व रायडर लोकेश कामडी ,शुभम श्रीवास्तव,जगत पटेल व इतर उपस्थित होते,हे रायडर सुरवातीला माँ जिजाऊ साहेबांचे जन्मस्थळ सिंदखेडराजा येथे जाणार असून त्यानंतर पुणे सातारा,सांगली ,कोल्हापूर भागातील शिवकिल्यांना भेट देऊन आपले दुर्गभ्रमण करणार आहे , त्यांच्या सुखकर प्रवासासाठी उपस्थित सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या
नागपुरातील ऑरेंजसिटी बाईकरायडर या संस्थेचे काही युवक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्यांच्या दर्शनासाठी रवाना
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com