नागपूर : विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सहा जिल्ह्यांमध्ये सकाळपासून मतदानास सुरुवात झाली आहे. मतदान शांततेत सुरु असून दुपारी १२.०० वाजेपर्यंत सर्व जिल्हयांमध्ये सरासरी ३४.७0 टक्के मतदान झाल्याची माहिती, निवडणूक अधिकारी तथा विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली आहे.
या निवडणुकीत एकूण २२ उमेदवार निवडणूक लढत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ३५.६६ टक्के मतदान झाले आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये दुपारी १२.०० वाजेपर्यंत २९.८२ टक्के मतदान झाले आहे. भंडारा जिल्ह्यात ३६.४८ टक्के मतदान झाले आहे. गोंदिया जिल्ह्यात ३१.८७ टक्के मतदान झाले आहे. वर्धा जिल्ह्यात ३९.८० टक्के मतदान झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ४२.१९ टक्के मतदान झाले आहे.