नागपूर शहर पोलीसांची दारुबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई 

नागपूर :- शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये २८ केस व एन.डी.पी.एस. अन्वये ०१ केस असे एकूण ०९ केसेसमध्ये एकुण ०९ ईसमावर कारवाई करून रु. १५,०१५/- या मुद्देमाल जप्त करण्यात आला, जुगार कायदा अन्यये २५ केस मध्ये १३ इसमावर कारवाई करून रु ७१५०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमाखाली एकूण ३२१७ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रु. ४,५८,१५०/- तडजोड शुल्क वसूल केले आहे. वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून या पुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीताविरूद्ध कारवाई,वाहनासह एकूण २०,४४,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त

Fri Oct 6 , 2023
नागपूर :-पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पौद्दार (भा.पो.से.) यांचे आदेशाने अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करणेकरीता एक विशेष पथक तयार करण्यात आले असुन हे पथक अवैध धंदयावर रेड कामी दिनांक ०४/१०/२०२३ रोजी खापरखेडा हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सिल्लेवाडा येथील गोपाल पांडे नावाचा इसम हा विनापरवाना आपले ट्रक व्दारे रेतीची चोरटी वाहतुक करणार आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com