नागपूर :- शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०७ केस व एन डी.पी.एस. कायद्यान्वये ०१ केस असे एकुण ०८ केसेसमध्ये एकुण ०७ ईसमावर कारवाई करून रू. ९३,०५०/- वा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच, जुगार कायद्यान्यये ०३ केसमध्ये ०६ ईसमावर कारवाई करून रु. ४५,९८०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३.६९३ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रु. ४,९९,६००/- तडजोड शुल्क वसूल केले आहे.
वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून या पुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालविताना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.