नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- दिनांक ३०.०७.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये १४ केसेस, तसेच एन.डी.पी. एस कायद्यान्वये ०१ केसेसे असे एकुण १५ केसेसमध्ये एकुण १५ ईसमांवर कारवाई करून १३,०८५/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच जुगार कायद्यान्वये ०३ कैसेसमध्ये एकुण ०४ ईसमावर कारवाई करून १८,४००/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकूण २,७४० वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. ३,९३,५५०/-रू. तडजोड शुल्क वसूल केले आहे. वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

120 किलो गोमांस जप्त

Wed Jul 31 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वारेगाव मार्गे तीनचाकी ऑटो ने गोमास तस्करी होत असल्याची गुप्त माहिती जुनी कामठी पोलिसांना कळताच पोलिसांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत जुमडे यांच्या मार्गदर्शनार्थ वारेगाव रोड वर सापळा रचून विना परवाना अवैधरित्या गोमांस वाहून नेणाऱ्या ऑटो वर धाड घालून ऑटोमध्ये असलेले तेरा हजार 200 रुपये किमतीचे असलेले 120 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com