नागपूर :-शिवाजी नगर जिमखान्याच्या वतीने आयोजित महाराष्ट्र राज्य युवा बास्केटबॉल स्पर्धेत नागपूरच्या मुला-मुलींच्या संघाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.
नागपूरच्या मुलांनी कोल्हापूरवर थरारक विजय मिळवला. कार्तिक पुनियाच्या निर्णायक ३ पॉइंट शॉट्समुळे नागपूरला ४ गुणांनी विजय मिळवता आला. त्याने एकूण १६ गुण केले, तर अर्जुन धुमेने १३ गुणांची भर घातली. कोल्हापूरकडून शांतोनु चॅटर्जीने ११ गुण केले. अंतिम स्कोअर ३५-३१ असा राहिला.
नागपूरच्या मुलींनी चंद्रपूर आणि वर्धा संघांचा सहज पराभव केला. चंद्रपूरच्या संघाविरुद्ध नागपूरने १९ गुणांनी विजय मिळवला. आर्या डगवारने ६ गुण केले, तर ज्ञानदा शैरेने उत्कृष्ट पासिंग कौशल्य दाखवत संघाला सहकार्य केले.
इतर सामन्यांमध्ये पुणे मुली, मुंबई शहर मुली, आणि अमरावती, औरंगाबाद व नाशिकचे मुले उपांत्य फेरीत पोहोचले आहेत.निकाल:
मुले :
वाशीम १७, भंडारा १६ वर विजय
परभणी ३८, अकोला ३३ वर विजय
सोलापूर ५९, मुंबई सिटी ५० वर विजय
नाशिक ५५, औरंगाबाद ३४ वर विजय
गडचिरोली ५४, अकोला ४७ वर विजय
मुली:
जळगाव २३, अकोला १५ वर विजय
सोलापूर ३२, वाशीम १० वर विजय
पुणे ४५, अकोला १५ वर विजय