नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरामध्ये सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवात विविध स्पर्धांमध्ये दिव्यांग मुले व मुलींनी आपले कौशल्य दाखविले. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानात गुरूवारी (ता.18) विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
खुल्या वयोगटात झालेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये नागपूर-बी संघाने ज्ञानज्योती संघाला पराभवाचा धक्का देत विजय मिळविला. नागपूर-बी संघाचा करण सामनावीर ठरला. तर ज्ञानज्योती संघाच्या परमेश्वरला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरविण्यात आले. नागपूर संघाचा योगेश उत्कृष्ट फलंदाज तर प्रणय नांदुरकर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला.
मतिमंद प्रवर्गात झालेल्या 15 वर्षाखालील मुले व मुलींची मॅरेथॉन पार पडली. यात मुलांच्या 2 किमी शर्यतीत बाबु (एकवीरा), विजयकुमार (एकवीरा), शोएब शेख (जीवनधारा) यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला तर रवी (एकवीरा) आणि संदेश वाघे (एकवीरा) यांना प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुलींच्या 1 किमी अंतराच्या शर्यतीत सारीका गावंडे (प्रेरणा), पुनम खोटेले (सेवायोग), टिना तानवे (सेवायोग) यांनी पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. उल्का लांडगे (जीवनधारा) आणि गायत्री मोरे (प्रेरणा) यांना प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आला.
ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानात दिव्यांगांच्या मतिमंद आणि अंध प्रवर्गामध्ये मॅरेथॉन, कॅरम, 100 मीटर दौड, बुद्धिबळ आदी स्पर्धा देखील घेण्यात आल्या. सर्व स्पर्धांमधील विजेत्या खेळाडूंना रोख पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
निकाल – मतिमंद प्रवर्ग
मॅरेथॉन – 15 वर्षाखालील वयोगट (अनुक्रमे 1 ते 5)
मुले – 2 किमी : बाबु (एकवीरा), विजयकुमार (एकवीरा), शोएब शेख (जीवनधारा), रवी (एकवीरा), संदेश वाघे (एकवीरा)
मुली 1 किमी : सारीका गावंडे (प्रेरणा), पुनम खोटेले (सेवायोग), टिना तानवे (सेवायोग), उल्का लांडगे (जीवनधारा), गायत्री मोरे (प्रेरणा)
100 मीटर दौड (वयोगट 12 ते 15) क्रमांक – एक ते तीन
मुले – राम, शनी, अजीत (तिघेही एकवीरा)
मुली – शीतल, सारीका गावंडे (प्रेरणा), ईशिका (आश्रय)
100 मीटर दौड (वयोगट 16 ते 23) क्रमांक – एक ते तीन
मुले – रवी (एकवीरा काचुरवाई), कार्तीक (अक्षय बुटीबोरी), करण (एकवीरा बालगृह)
मुली – पूनम (सेवायोग), कार्तीका (संत विक्तुबाबा), जयश्री (प्रेरणा घोराड)
कॅरम (खुला वयोगट) क्रमांक – प्रथम व द्वितीय
मुले – संदेश वाघे – मोहम्मद शमी, श्रीकांत निपाने – प्रेम अहिरवार
मुली – निलीमा जोशी – जिजाई अष्टेकर, प्रिती अमला – रागिणी वाघाडे
अंध प्रवर्ग
मॅरेथॉन 15 वर्षाखालील वयोगट (अनुक्रमे 1 ते 5)
मुले (2 किमी) – सावंत गोरेवार, प्रवीण करलुके (दोघेही आंबेडकर), क्षितीज ताजने (ब्लाईंड), लोकेश रंगारी, सुरज बोबाटे (दोघेही आंबेडकर)
मुली (1 किमी) – महेक विरघरे (ज्ञानज्योती), निकीता डोंगरे (आंबेडकर), काजल तांडेकर, रागिनी तातीरवार, हर्षकला आडे (तिघी ज्ञानज्योती)
क्रिकेट (खुला गट)
विजेता – नागपूर –बी, उपविजेता – ज्ञानज्योती
सामनावीर – करण (नागपूर-बी), उत्कृष्ट गोलंदाज – परमेश्वर (ज्ञानज्योती), उत्कृष्ट फलंदाज – योगेश (नागपूर-बी), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – प्रणय नांदुरकर (नागपूर-ए)
बुद्धिबळ (खुला वयोगट – पूर्णत: अंध)(प्रथम व द्वितीय)
मुले – इम्तियाज खान, आकाश काडीवार
मुली – प्रियंका गोस्वामी, पूनम ठाकरे
100 मीटर दौड (13 ते 18 वर्ष वयोगट – अंधत: अंध)
(प्रथम, द्वितीय व तृतीय)
मुले – क्षितीज ताजने, दिनेश शेख, निरज कुमरे
मुली – काजल तांडेकर, महेक विरघरे, समृद्धी दहीवरे