उद्योगांसाठी नागपूर हे आदर्श ठिकाण – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

– सीआयआयतर्फे ‘विदर्भ आयटी कॉन्क्लेव्ह’

नागपूर :- वेगाने विकसित होणाऱ्या नागपुरात देशातील नामवंत कंपन्या गुंतवणूक करीत आहेत. इतर सर्व उद्योगांसह आयटी क्षेत्रातील नामवंत कंपन्यांही नागपूरकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे देशाच्या ह्रदयस्थानी असलेले नागपूर आता उद्योगांसाठी एक आदर्श ठिकाण ठरत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले.

कॉन्फेडरेशन आफ इंडियन इंडस्ट्रीजच्या (सीआयआय) वतीने मिहान येथे आयआयएमच्या सभागृहात विदर्भ आयटी कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले. यावेळी ना. नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती होती. सीआयआयचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. नंदकुमार, आयआयएमचे संचालक डॉ. भीमराया मेत्री आदींची प्रमुख उपस्थिती होती. ना.गडकरी म्हणाले, ‘नागपूर हे झिरो माईल आहे. देशातील सर्व प्रमुख शहरांना सारख्या अंतराने जोडले गेलेले शहर आहे. लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णत्वास आल्यानंतर आणखी मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. नागपुरात आजही आयात-निर्यातीच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. लवकरच नागपूर हे लॉजिस्टिक हब म्हणून नावारुपास येत आहे. अशा परिस्थितीत उद्योगांसाठी नागपूर हे सर्वाधिक आदर्श असे ठिकाण ठरणार आहे.’ नागपूर शहर अनेक बाबतीत देशातील मोठ्या शहरांच्या तुलनेत वेगळे असल्याचेही ते म्हणाले. देशातील अनेक मोठी शहरे आज प्रदूषणाच्या समस्येने त्रस्त आहेत. या शहरांमध्ये वाहतूक कोंडीचाही प्रश्न आहे. नागपूर मात्र सर्व बाबतीत उत्तम आहे. इथे प्रदूषण ही समस्या नाही. एक चांगली स्मार्ट सिटी विकसित होण्याची पूर्ण क्षमता नागपूरमध्ये आहे. चांगली उद्याने, खेळाची मैदाने झाली पाहिजेत. सर्वसामान्य माणसांचे जीवनमान उंचावले पाहिजे, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, असे ना. गडकरी म्हणाले. उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगल्या सुविधा, चांगली घरे, सार्वजनिक वाहतुकीची साधने देण्यास नागपूर पूर्णपणे सक्षम असल्याचेही त्यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दखणे हायस्कूल कन्हान येथे " विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम नियोजन " 

Sat Aug 5 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- श्री बळिराम दखने हायस्कुल कन्हान येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ या निमित्त ” विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम नियोजन ” कार्यक्रमात तृणधान्य पिकाबाबत शास्त्रीय माहिती आणि खेळीमेळीच्या वातावरणात धान्य पिकाबाबत माहिती व जागरूकता निर्माण करण्यात आली. शुक्रवार (दि.४) ऑगस्ट ला आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ या निमित्त” विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम नियोजन” निमित्य कार्यक्रम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com