नागपुरात    12 ते 14 मार्च दरम्यान खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन  

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार  उद्घाट्न 

 नागपूर  –  केंद्रीय सुक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत नागपुरातील एम एस एम ई विकास संस्था तसेच विदर्भातील  सर्व आघाडीच्या उद्योग संघटनांच्या सहकार्याने    12 ते 14 मार्च दरम्यान खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून याचे  उद्घाटन उद्या 12 मार्च शनिवार रोजी सकाळी 11 वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. हा तीन दिवसीय महोत्सव हा महाराष्ट्र इंडस्ट्रीज असोसिएशन -एम.आय.ए.  हाऊस,पी-28  हिंगणा औद्योगिक क्षेत्र नागपूर येथे होणार असून  विदर्भातील औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी आणि विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी भव्य प्रदर्शन तसेच राष्ट्रीय विक्रेता विकास कार्यक्रम या महोत्सवात आयोजित करण्यात आला आहे. विदर्भातील एमएसएमई यांना प्रोत्साहन देणे हा या उत्सवाचा मुख्य उद्देश आहे या महोत्सवामध्ये गव्हर्मेंट ई मार्केट प्लेस, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, मिनरल ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड , मॅंगनीज ओर इंडिया लिमिटेड , भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड , इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यासारखे विविध सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, औष्णिक विद्युत प्रकल्प .केंद्र आणि राज्य शासनाच्या अंतर्गत असणाऱ्या संस्था तसेच खाजगी संस्था खासदार औद्योगिक महोत्सवात सहभागी होणार आहेत.

तीन दिवसीय महोत्सवामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील केंद्रीय तसेच राज्य शासनाचे उपक्रम यातील अधिकारी  तसेच उद्योगाचे प्रतिनिधी तांत्रिक सत्रामध्ये  विक्रेता विकास आणि नोंदणी प्रक्रिया तसेच  वार्षिक गरजा संदर्भात  परिसंवादांमध्ये सहभाग घेतील. एमएसएमई -विकास  संस्था तसेच ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डचे प्रतिनिधी उद्योजकांसाठी असणाऱ्या  या संस्थाच्या योजना स्पष्ट करतील.  त्याचप्रमाणे स्टार्ट-अप कॉन्क्लेव्ह, गुंतवणूकदारांची बैठक आणि उद्योजकता जागरूकता कार्यक्रम  आयोजित केले जातील. ज्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील मधील अधिकारी यांच्यासोबत संवादात्मक सत्र देखील आयोजित केले जाणार आहेत.

सर्व संभाव्य आणि विद्यमान उद्योजक , संशोधन आणि शैक्षणिक संस्था अभियांत्रिकीचे विद्यार्थी  यांना या संधीचा लाभ घेण्यासाठी या भव्य महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन एम एस एम ई विकास संस्थेचे संचालक  पी.एम, पार्लेवार यांच्या वतीने करण्यात आले आहे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शेतकरी बांधवांच्या हिताचा आणि सहकार, पणन क्षेत्र अधिक सक्षम करणारा अर्थसंकल्प - सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील

Sat Mar 12 , 2022
 मुंबई : सहकार व पणन   विभागासाठी 1 हजार 512 कोटी रुपयांची भरीव अशी तरतूद करून शेतकरी बांधवांच्या हिताचा आणि  सहकार व पणन क्षेत्र अधिक सक्षम करणारा राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला. अशी प्रतिक्रिया  सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदनही त्यांनी केले.             सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, या अर्थसंकल्पात नियमित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com