‘नागार्जुनात’ उल्हास 2K23 वार्षिक उत्सव थाटात संपन्न.

नागपूर :- मैत्रेय एज्युकेशनल सोसायटी द्वारा संचलित नागार्जुन इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट सातनवरी येथे 28 व 29 एप्रिल 2023 ला वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. संजय दुधे प्र.कुलगुरू आरटीएमयू नागपूर यांच्या हस्ते झाले. यावेळेस स्टँडअप कॉमेडियन नेहा ठोंबरे, मैत्रेय एज्युकेशनल सोसायटीचे अध्यक्ष मा.इंजि मदन माटे, सेक्रेटरी अजय वाघमारे, प्राचार्य संजय केलो, उपप्राचार्य मुरलीधर रहंगडले, संयोजक प्रा.संदीप ठाकरे आणि विद्यार्थी प्रतिनिधी आशिक कापसे आणि माधवी गेडाम उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली प्रा. स्वाती सोनटक्के व प्रा.अमित मेश्राम यांनी स्वागत पर गीत सादर केले. भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण करून व द्वीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुणे संजय दुधेनी आपल्या भाषणात G – 20 चे महत्व सांगताना सस्टेनेबल ठेवलपमेंट काय आहे हे समजून सांगितले व ‘वसुधैव कुटुंबकम्’ असा असेल. ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या ब्रिदाप्रमाणे या दृष्टिकोनाचा त्यात अंतर्भाव केला जाईल. असे काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन वाढवले. व त्यानंतर स्टँड अप कॉमेडियन व रील व्हिडिओची सनसेस्नल सेलिब्रिटी म्हणून ओळखली जाणारी नेहा ठोंबरे यांनी आपल्या वऱ्हाडी भाषेत विद्यार्थ्यांची संवाद साधला व काही शॉर्ट रिल्स प्रयोग ही सादर केलेत. या स्नेहसंमेलनात विविध रंगारंग कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गायन संगिताने झाली. प्रशिक्षक म्हणून डॉ.रामकृष्ण छांगणी (जॉईंट सेक्रेटरी आरटीएम कॅन्सर हॉस्पिटल) लाभले. गायनाचे संचालन सीएससी डिपार्टमेंटचे विद्यार्थी सृष्टी वाघचवरे व हर्ष प्रसाद यांनी केली.गायनाच्या सदाबहार कार्यक्रमानंतर फॅशन शो आयोजित करण्यात आले. याला आयकॉनिक सेलेब्रिटी आयुषी लाडे. ( इग्नाइट अकॅडमी) प्रशिक्षक म्हणून उपस्थित होत्या याचे संचालन जानवी कटरमल ने केले. दोन दिवसीय चालणाऱ्या उल्हास 2K23 मध्ये 29 ला वादविवाद स्पर्धा, नृत्य सादरीकरण व नाटक अशा स्पर्धा घेण्यात आल्या. याचे संचालन तिश्मिता कापसे व पायल मेश्राम हिने केले. 29 एप्रील ला बक्षीस वितरणाचा समारंभ मि.मिर्झा बेग (अटलांटा चे व्यवस्थापक) यांच्या हस्ते झाला. NIETM आयडॉल चा मान राहुल मेश्राम याला मिळाला, तसेच मिस्टर अँड मिस एनआयटीएम जय नवघरे आणि कृतिका डोंगरे ठरलेत. डॉ साजिदुल्लाखान, डॉ.योगेश बैस, डॉ. कुशाल यादव, डॉ. जयगोपाल अंबादे, डॉ.मोईन देशमुख, प्रा.संजय बनकर, प्रा.चार्ली फुलझेले प्रा.सचिन मते, प्रा.रसिक उपाध्याय, प्रा.अतुल अकोटकर, प्रा.वृषाली पराये, प्रा.अश्विनी वालदे, प्रा. प्रशिलकुमार इंगळे, प्रा.प्रिया फरकाडे, प्रा.कल्याणी फुलझेल, प्रा.वैष्णवी ठमके, प्रा.दीक्षा बनसोड, प्रा.जयेश तांदुळकर, प्रा.शुभम इंगोले, प्रा.आतिफ नवाब, प्रा.मयूर मालते, प्रा.मनीष थूल, प्रा.दर्शना खडसे, प्रा.फाजेला फारोज, प्रा.बिना रेवतकर, सहाय्यक नम्रता नाईक, वैष्णवी बोपचे, चंद्रशेखर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जानवी अहिरे व जानवी कटरमल या विद्यार्थ्यांनी केले तर संयोजक प्रा.संदीप ठाकरे यांनी मान्यवरांचे व उपस्थितीत लोकांचे आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्राला 'ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी'चे राज्य करणार उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार

Mon May 1 , 2023
महाराष्ट्र दिनानिमित्त कस्तुरचंद पार्कवर ध्वजवंदन उत्साहात नागपूर :- महाराष्ट्र हे देशात नेहमीच अग्रेसर राज्य राहिले आहे. आगामी काळात त्याला आणखी प्रागतिक करण्याचे आमचे प्रयत्न राहणार असून महाराष्ट्र हे ‘ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’ असणारे राज्य करू, असा निर्धार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. नागपूर येथील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क मैदानावर महाराष्ट्र राज्याच्या ६३ व्या वर्धापन दिनाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com