संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- ग्रामपंचायत भिलगाव येथील अंगणवाड्यांना प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे सभापती महिला व बालकल्याण समिती जि.प. नागपुर यांनी भेट देऊन आढावा घेतला. शासनाकडून स्तनदा माता व बालकांना पुरविल्या जाणाऱ्या आहाराची तपासणी केली व अंगणवाडीमध्ये रोज बालकांना खाऊ घातल्या जाणारा शिजलेला आहारही स्वतः प्रा. अवंतिका रमेश लेकुरवाळे यांनी खाऊन तो आहार खाणे योग्य आहे की नाही याची खात्री केली. महिलांनी व किशोर वयीन मुलींनी स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी व रोजच्या आहार हा प्रोटीन युक्त आहार कसा घ्यावा आणि गर्भवती स्त्रियांनी काय योग्य ती काळजी घ्यावी तसेच बालके सुदृढ कसे राहतील अशा अनेक विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करून आहार वाटप केले. तसेच स्त्रियांनी मासिक पाळी मध्ये काय काळजी घ्यावी ज्याच्यामुळे शरीरावर कोणतेही परिणाम होणार नाही व आरोग्य चांगले राहील तसेच सॅनिटरी नॅपकिनचे महत्व सांगून सर्व स्त्रियांना सॅनिटरी नॅपकिन वापरायचे आव्हान केले व सॅनिटरी नॅपकिन वाटप केले.
याप्रसंगी दिशा चनकापुरे सभापती पं.स. कामठी, मोहन माकडे सदस्य जि.प. नागपुर, भावणा फलके सरपंच भिलगाव, मनोज जिभकाटे उपसरपंच भिलगाव आणि सर्व ग्रा.पं. सदस्य, आईसीडीएस सुपरवायझर , अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, महिला व बालके उपस्थित होते.