स्वरशिल्पतर्फे संगीतमय कार्यक्रम २७ आणि २९ सप्टेंबरला

– ‘सुहाना सफर’ आणि ‘एक एहसास, दो जुबां’चे निःशुल्क आयोजन

नागपूर :- स्वरशिल्प संगीत अकॅडमीतर्फे येत्या २७ आणि २९ सप्टेंबरला ‘सुहाना सफर’ आणि ‘एक एहसास, दो जुबां’ या आगळ्यावेगळ्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहामध्ये दोन्ही कार्यक्रमाची निःशुल्क प्रस्तुती करण्यात येणार आहे.

स्वरशिल्प संगीत अकॅडमीच्या संचालिका भाग्यश्री बारस्कर यांच्या संकल्पनेतून २७ सप्टेंबरला ‘सुहाना सफर’ आणि २९ सप्टेंबरला ‘एक एहसास, दो जुबां’ या दोन्ही संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. २७ सप्टेंबरला आयोजित ‘सुहाना सफर’ या कार्यक्रमात ५० विद्यार्थ्यांच्या समूहाचा सहभाग असेल. प्रत्येक ग्रुपला वेगवेगळी थीम, वेगवेगळी वेशभूषा देण्यात येईल व त्यास अनुसरून संगीतमय सादरीकरण केले जाईल.

याशिवाय समानार्थी हिंदी-मराठी गीतांची महफिल असलेला ‘एक एहसास, दो जुबां’ या कार्यक्रमाचे २९ सप्टेंबरला आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात एकाच अर्थाचे एक हिंदी आणि एक मराठी गीत प्रस्तुत करण्यात येईल.

कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून २७ सप्टेंबरला पद्मिनी जोग आणि २९ सप्टेंबरला डॉ. राज गजभिये उपस्थित राहतील. दोन्ही कार्यक्रमाला निवेदन श्वेता शेलगावकर यांचे असेल. परिमल जोशी, नंदू गोहणे, रितेश त्रिवेदी, प्रशांत नागमोते आणि या वादक कलाकारांची संगीत साथ लाभेल.

कार्यक्रम निःशुल्क असून जास्तीत जास्त रसिक श्रोत्यांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन स्वरशिल्पतर्फे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महामार्गावर मोकाट जनावरांच्या वावरामुळे अपघाताचे प्रमाणात वाढ झाली असून मोकाट जनावरांच्या मालकांवर केली जाणार कारवाई

Wed Sep 25 , 2024
नागपूर :- ग्रामीण ह‌द्दीत महामार्गावर मोकाट जनावरांच्या कळपामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असुन त्यामुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाणात वाढ झाली आहे. सदर बाबीची दखल मा. पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार यांनी घेतली असुन ज्या मालकांची जनावरे रस्त्यावर मोकाट फिरत असतील अशा जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे. नागपूर ग्रामीण पोलीसांनी रस्ते वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या रस्त्यावरील मोकाट जनावरांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com