अमरदिप बडगे, प्रतिनिधी
चिचगड पलिसांची मोठी कारवाई….आरोपी पोलिसांच्या ताब्यात
गोंदिया :- जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील चिचगड पोलिस स्टेशनला दिनांक १७ सप्टेबंर रोजी पुष्पा दिलीप अरकरा वय २६ वर्षे ह्यानी पोलिस स्टेशनला येवुन तिचा पती दिलीप संतराम अरकरा वय ३५ वर्षे हा घरुन गुम झाल्याची तक्रार केली. त्यावर पोलिस स्टेशन चिचगड ला तक्रार दाखल करुन चौकशी सुरु करन्यात आली.दिनांक १९ सप्टेबंरला पुष्पा अरकरा यानीं पोलिस स्टेशन चिचगडला येवुन माहीती दिली की, चिचगड पोलिस स्टेशन हद्दीतील मौजा तुमडीमेंढा शेतशिवारा जवळील जंगल भागातील नाल्याजवळ माझा गुमसुदा असलेला पती मृत अवस्थेत दिसुन आला आहे.
पोलिसानां माहिती मिळताच पोलिसानीं घटनास्थळी धाव घेतली. मृतक इसमास कोणीतरी अज्ञात इसमाने हत्याराने वार करुन मारुन त्याच्या कमरेला मोठा दगड बांधुन नाल्याच्या पाण्यात फेकुन दिले असल्याचे निष्पन्न झाल्याने, पोलीस स्टेशनला पुष्पा दिलीप अरकरा यांचे तोंडी रिपोर्ट वरुन कलम- ३०२,२०१ भा.दं.वि. चा गुन्हा नोंद करुन तपासाला सुरूवात करन्यात आली. गुन्ह्याच्या तपासात संशयीत रतिराम दशरथ कुंभरे वय ४२ वर्षे यास ताब्यात घेवुन चौकशी केली असता मृतक याचे रतिराम कुंभरे याचे पत्नीसोबत अनैतीक संबंध असल्याच्या संशयावरुन आरोपी १) रतिराम दशरथ कुंभरे, २) छेदीलाल कारुजी आचले ३) मोतीराम पांडुरंग नेताम सर्व रा. तुमडीमेंढा यांचे मदतीने कुऱ्हाडीने सपासप वार करुन त्यास जिवानीशी ठार करुन प्रेताच्या कमरेला साडीने दगड बांधुन नाल्याच्या पाण्यात फेकुन दिले. तिन्ही आरोपीनां दिनांक १९ सप्टेबंरला सकाळच्या सुमारास अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधिक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भिसे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, चिचगड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. शरद पाटील, यांनी केली आहे.