राज्य शासनाच्या शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीत मनपाच्या शिक्षकांना घवघवीत यश

नागपूर :- महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने आयोजित शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षकांना घवघवीत यश प्राप्त झाले आहे. सहा गटांमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत. मनपाच्या शिक्षिका शुभांगी पोहरे, दीप्ती बिस्ट, वैशाली चिडे, ज्योती कोहळे, नंदा उत्तम बोहरपी,  सीमा भिडे, वनिता तऱ्हाणे, शिक्षक भारत गोसावी यांना यश प्राप्त झाले आहे.

मनपाच्या शिक्षकांना मिळालेल्या यशाबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी,अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, शिक्षणाधिकारी साधना सयाम यांनी अभिनंदन केले आहे.

राज्य शासनाच्या वतीने दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा पहिली ते दुसरी -भाषा,गणित ,इंग्रजी .तिसरी ते पाचवी भाषा,इंग्रजी, परिसर अभ्यास,सहावी ते आठवी भाषा ,गणित,इंग्रजी ,विज्ञान, समाजिकशास्त्र 9 ते 10 -भाषा ,गणित ,इंग्रजी ,विज्ञान, समाजिकशास्त्र घेण्यात आली. तालुका,जिल्हा,राज्य या तीन स्तरावर झालेल्या स्पर्धेतील तालुका स्तरीय भाषा गटात प्रथम क्रमांक पन्नालाल देवडिया हिंदी माध्यमिक मनपा शाळेच्या वर्ग 8 वी च्या हिंदी विषयाच्या उपक्रमशील शिक्षिका शुभांगी पोहरे यांना प्राप्त झाला तर, त्यांना द्वितीय क्रमांक सामाजिकशास्त्र इयत्ता 10 वी व जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार इयत्ता 9 वी समाजिकशास्त्र साठी देखिल पुरस्कार प्राप्त झाला आहे. यापूर्वी त्यांना 2015 चा आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

तसेच सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेच्या विज्ञान शिक्षिका यांना तालुका स्तरीय प्रथम क्रमांक इयत्ता 9 वी ते 10 वी विषय -विज्ञान, व जिल्हा स्तरीय प्रथम क्रमांक पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. यापूर्वी त्यांना 2023 चा राज्यशासनाचा सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.विज्ञान विषयात त्यांचा हातखंडा आहे.

पन्नालाल देवडिया हिंदी उच्च प्रा.शाळेचे शिक्षक भारत गोसावी यांना तालुका स्तरीय प्रथम क्रमांक तिसरी ते पाचवी विषय -परिसर अभ्यास, व सहावी ते आठवी -विज्ञान प्रथम क्रमांक ,नववी ते दहावी समाजिकशास्त्र तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.

जयताळा माध्य शाळेच्या शिक्षिका वैशाली चिडे यांना इयत्ता 9 वी ते 10 वी विषय गणित मध्ये तालुका स्तरीय प्रथम क्रमांक तर समाजिकशास्त्र 9 वी ते 10वी साठी प्रथम क्रमांक , जिल्हास्तरीय 9ते 10 समाजिकशास्त्र विषयात तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. शिक्षिका ज्योती कोहळे यांना तालुका स्तरीय 6ते 8 भाषा गटात द्वितीय क्रमांक. प्राप्त झाला आहे. त्यांना 2024 चा राज्य आदर्श पुरस्कार मिळाला आहे.

जयताळा माध्यमिक शाळेच्या शिक्षिका वनिता तऱ्हाणे यांना तालुकास्तरीय विषय गणित प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर नंदा उत्तम बोहरपी यांना पहिली ते दुसरी तालुका स्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.

विवेकानंद हिंदी उच्च प्राथमिक शाळा शिक्षिका या सीमा भिडे जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पहिली ते दुसरी विषय गणित मध्ये प्राप्त झाले आहे.अशा प्रकारे नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षकांनी दर्जेदार व्हिडीओ बनवून यश संपादन केले आहे .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्र राज्यात योग आयोग लागु करावा - राजपाल सिंह बैस

Mon Oct 14 , 2024
नागपूर :- महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे नागपूर शहर अध्यक्ष संदिप माने यांच्या पुढाकाराने भापकर पार्क येथे क्रासफिट जीम व सुरक्षाभिंत च्या बांधकामांच्या भुमिपुजनाच्या प्रसंगी महाराष्ट्र योग शिक्षक संघ महाराष्ट्र, नागपूर जिल्हा व नागपूर शहर च्यावतीने महाराष्ट्र राज्यात योग आयोग लागु करावा. याकरिता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणारे निवेदन व त्यासोबतच बारासुत्री मांगणीपत्र त्यांचे मानद सचिव संदिप जोशी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!