नागपूर :-म्युनिसिपल कामगार एकता युनियन कडून कोव्हिड योध्दा यांचा मोर्चा सोमवार दिनांक १९ डिसेंबर 2022 दुपारी १२ वा. खंडोबा मंदिर समोर कॉटन मार्केट नागपूर येथून सुरू होणार असून विधान भवन, नागपूर येथे जाणार आहे. महाराष्ट्रातील सर्व कोव्हिड योध्यांच्या मागण्या सरकार पर्यंत पोहोचाव्यात याकरता हा मोर्चा आयोजित करण्यात येत आहे.
कोव्हिड महामारीत कोव्हिड योध्दा यांनी जिवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली आहे. कोव्हिड महामारीत सरकारच्या शब्दांवर विश्वास ठेवून कोव्हिड योध्दे हे महान सेवेसाठी झटले आहेत. अशा कोव्हिड योध्दे यांना कामावरुन काढण्यात आले. कोव्हिड योध्दा यांना सेवेत कायम करावे, कोव्हिड भता मिळवून देण्यासाठी व सानुग्रह अनुदान मिळवणे यासाठी म्युनिसिपल कामगार एकता युनियन एक आंदोलन सुरू केले आहे. यासाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे.
प्रमुख आणि मार्ग दर्शक कॉ.मनोज यादव (अध्यक्ष,म्यु का एयु) कॉ.जगनारायण गुप्ता, सरचिटणीस (म्यु का ए.यु ) कॉ.मोहम्मद ताजुद्दिन अध्यक्ष, सिटू नागपूर, कॉ.दिलीप देशपांडे सरचिटणीस सिटू, नागपूर, कॉ राजेंद्र साठे सचिव, सिद्धू, नागपूर, डॉ.किरण जाधव, तौसिफ पटेल, सचिन मुनेश्वर, नागपूर उपस्थित राहणार आहेत. प्रमुख मागण्या आहेत.
१.कोव्हिड योध्यांना सरकारी आरोग्य व्यवस्थापनात कायम स्वरुपी समावून घ्या
२.कोव्हिड भत्ता आणि सानुग्रह अनुदान कोव्हिड योध्दांना दिले जावे.
३) सर्व कोविड योध्यांना, कोविड सेवेबद्दल मान्यताप्राप्त प्रमाण पत्र देण्यात यावे.