मनपा ‘सुपर-७५’ विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या बॅचचे शिकवणी वर्ग सुरू

नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या शाळांतील ‘सुपर-७५’ विद्यार्थ्यांना खासगी कोचिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. या ‘सुपर-७५’ विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या बॅचला शनिवारी (ता.१६) नेताजी मार्केट हिंदी माध्यमिक शाळेत सुरुवात करण्यात आली.

यावेळी मनपा शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रिकोटकर,  असोसिएशन्स ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूटचे मनोज तवानी, मनपा शाळांचे मुख्याध्यापक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासातच नव्हे तर विविध क्षेत्रात यशाच्या पताका रोवल्या. मनपा शाळेतील विद्यार्थी कोणापेक्षाही कमी नाही. या विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा असूनही केवळ परिस्थितीने मागे राहू नयेत यासाठी ‘सुपर-७५’ ही संकल्पना पुढे आली. अशी माहिती मनपा शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रिकोटकर यांनी यावेळी दिली. पुढे त्या म्हणाल्या, सुपर-७५ विद्यार्थ्यांमध्ये २५ विद्यार्थ्यांना नीट, २५ विद्यार्थ्यांना जेईई साठी तर २५ विद्यार्थ्यांना एनडीएसाठी तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या वर्गासाठी नियमित हजर राहावे तसेच पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यांसाठी पुढाकार घेऊन त्यांचा नियमित अभ्यास घ्यावा, असे आवाहन यावेळी मनपा शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रिकोटकर यांनी केले.

नागपूर शहरातील असोसिएशन्स ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूटद्वारे यासाठी नि:शुल्क सेवा देण्याची तयारी दर्शविण्यात आली. त्यातून असोसिएशनद्वारे मनपाच्या इयत्ता आठवी मधील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. त्यात सर्वोत्तम कामगिरी दर्शविणा-या ७५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. हा उपक्रम मनपाद्वारे दरवर्षी सुरू राहणार असून भविष्यात हे विद्यार्थी, अभियांत्रिकी क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात किंवा देशाच्या संरक्षण क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमठवून स्वत:सह परिवार आणि आपल्या शहराचे नाव लौकीक करतील असा विश्वास मनपा शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

‘मिहान’ मधील प्रकल्पांना सवलतीच्या दरात वीज देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार - सुभाष देसाई

Sun Apr 17 , 2022
*  ‘मिहान ‘मध्ये उद्योगसमूह वाढावेत यासाठी विशेष प्रयत्न करणार *  नागपूर मध्ये लवकरच अॅडव्हाँटेज महाराष्ट्र उपक्रम राबविणार *  समृद्धीच्या आजूबाजूला औद्योगिक क्षेत्र निर्मितीला गती देणार *  विदर्भातील रिफायनरीबद्दल संबंधित कंपनी व केंद्र शासन निर्णय घेईल *  रिफायनरी संदर्भात जागा शोधण्यासाठी कंपनीचे पथक येणार *  औद्योगिक समूहात राज्यात कुठेही लोडशेडींग नाही नागपूर : विदर्भ नागपूरसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून पुढे आलेल्या मिहान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com