नवशक्ती आयुर्वेदीक दवाखानाविरुद्ध मनपाची पोलीसात तक्रार

चंद्रपूर :- शहरात विना परवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्या नवशक्ती आयुर्वेदीक दवाखानाविरुद्ध महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत चंद्रपूर महानगरपालिका झोन क्र. १ कार्यालयाद्वारे शहर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शहरातील जटपुरा गेट तसेच छोटा बाजार चौक रोड परिसरातील भिंतींवर,विविध शासकीय व खाजगी परिसरात नवशक्ती आयुर्वेदीक दवाखान्याची जाहिरात करणारे स्टीकर्स, भिंतीपत्रके मनपाकडुन पूर्वपरवानगी न घेता लावले असल्याचे सहायक आयुक्त यांना २६ जुन रोजी पाहणीदरम्यान आढळुन आले.

संबंधितास भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून पत्रके काढण्यास सांगितले असता अद्याप पावेतो भिंतीपत्रके न काढल्याने नवशक्ती आयुर्वेदीक दवाखाना यांच्यावर महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत कलम ३ नुसार फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा अश्या आशयाची तक्रार करण्यात आली आहे. जाहिरात करण्यास अश्या प्रकारचा अवलंब केल्याने शासकीय निधीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते तसेच शहर सुशोभीकरणाच्या कामातही बाधा निर्माण होते .

भिंतीपत्रके,पोस्टर्स,बॅनरबाजीमुळे शहराच्या विद्रुपीकरण होते किंबहुना वाहतुकीसही अडथळा निर्माण होत असल्याने याबाबत उच्च न्यायालय आणि राज्य शासनाने आखुन दिलेल्या सुचनांनुसार कारवाई करण्यात येते. त्यानुसार, परवानगीशिवाय पॅम्प्लेट्स, बॅनर्स, होर्डिंग्ज,कापडी फलक लावणा-यांवर आर्थिक दंडासह कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद या धोरणामध्ये करण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्हा माहिती कार्यालय नियोजन भवन भंडारा येथे स्थानांतरित

Sat Jun 29 , 2024
भंडारा :- महाराष्ष्ट्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची प्रचार प्रसिध्दीचे कामकाज जिल्हा माहिती कार्यालयाव्दारे करण्यात येते. हे कार्यालय या पूर्वी जूने नियोजन कार्यालयात होते. आता जिल्हा माहिती कार्यालयाचे स्थलांतरण नियोजन भवन येथे दुसऱ्या माळ्यावर झाली असून याची नोंद सर्व माध्यम प्रतिनिधी पत्रकार तथा नागरिकांनी घ्यावी, असे जिल्हा माहिती अधिकारी,शैलजा वाघ-दांदळे यांनी कळविले आहे. @ फाईल फोटो Follow us on Social Media […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com