महापालिका कर्मचाऱ्यांना ई-वाहन खरेदीसाठी मिळणार प्रोत्साहनपर राशी

– पर्यावरणपुरक उपाययोजना अंतर्गत मनपाचे पाऊल

चंद्रपूर :- माझी वसुंधरा अभियानांतर्गत वायू प्रदूषणावर उपाययोजना म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले जात असुन ई-वाहन खरेदी करण्यास इच्छुक अधिकारी कर्मचाऱ्यांना १ लक्ष रुपये अग्रिम राशी दिली जाणार आहे.

चंद्रपूर शहर हे मोठ्या प्रमाणात प्रदुषित शहरांपैकी एक गणले जाते. प्रदूषणास इतर घटकांबरोबरच पेट्रोल व डिझेल वाहनांची वर्दळही कारणीभुत आहे. त्यामुळे ई-वाहनांचा वापर वाढणे व पेट्रोल- डिझेलचा वापर कमी होणे गरजेचे आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धन व प्रदुषण नियंत्रण हा महत्चाचा घटक आहे. ई-वाहनांच्या वापरास प्रोत्साहन दिल्यामुळे पंचतत्वातील वायु या घटकाचे संवर्धन होणार आहे. याच तत्वावर काम करत चंद्रपूर महानगरपालिकेने हे सकारात्मक पाऊल उचलले आहे.

याअंतर्गत ई-वाहन खरेदी करण्यास इच्छुक अधिकारी कर्मचाऱ्यांना १ लक्ष रुपये अग्रिम राशी दिली जाणार असुन अग्रिम राशीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातुन दर महिन्याला कपात करण्यात येणार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार २७ जून रोजी झालेल्या प्रशासकीय बैठकीत सदर ठराव मंजूर करण्यात आला असुन पर्यावरणपुरक उपाययोजना अंतर्गत मनपातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

धापेवाडा यात्रेदरम्यान मंदिर परिसरात ‘नो पार्किंग झोन’

Thu Jun 29 , 2023
नागपूर :- धापेवाडा विठ्ठल रूख्मणी देवस्थान विर्दभाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाते. दरवर्षी आषाढी एकादशीला येथे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. 29 जुन ते 4 जुलै 2023 दरम्यान धापेवाडा येथे यात्रेचे आयोजन करण्यात आले‍ आहे. मंदिर परिसरामध्ये वाहनांची गर्दी होऊ नये म्हणून पुलाखालील मार्गावरील दोन्ही बाजुने ‘नो पार्किंग झोन’ घोषित करण्यात आल्याचे ग्रामीण पोलिस अधिक्षक यांनी कळविले आहे. मंदिर परिसरामध्ये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com