अमरावती येथील मनपा आयुक्तांवर शाई फेकल्याप्रकरणी चंद्रपूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केला निषेध

चंद्रपूर – अमरावती येथील मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर तीन महिलांनी शाई फेकल्या प्रकरणी या घटनेच्या निषेधार्थ चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवार, दिनांक 10 फेब्रुवारी रोजी काळ्या फीती लावून काम केले. 
चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या युनियनने एकत्रित येत या घटनेचा निषेध केला आणि गुरुवारी दिवसभर फिती लावून कामकाज केले. शाही फेकणाऱ्या आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी शासनाला पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांना देण्यात आले.
 
९ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी १.१५ च्या दरम्यान अमरावती येथील राजापेठ अंडर बायपास उड्डाणपुलाची पाहणी करण्यासाठी अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर गेले होते. तेथे काही महिलांनी आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर यांच्या अंगावर शाई टाकुन त्यांना धक्काबुक्की केली तसेच त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही नक्कीच अत्यंत चिताजनक बाब असून, भारतीय नगर परिषद कामगार संघ जिल्हा चंद्रपूरच्या वतीने या गुन्हेगारी कृत्याचा १०/०२/२०२२ रोजी चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर कार्यरत अधिकारी व कर्मचारी वतीने या जाहीर निषेध करण्यात आला.

हल्लेखाराना तात्काळ अटक करुन शीघ्र गतीने खटला चालवून कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न व्हावेत, अशी मागणी भारतीय नगर परिषद कामगार संघाचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

काटोल  विधान  क्षेत्र  के समस्याऐं  हल करने केलिये  राज्य मंत्री  से व्ही सी के माध्यम  से  जायजा  बैठक!

Thu Feb 10 , 2022
सलिल देशमुख  तथा संबधीत  विभाग  के वरिष्ठ  अधीकारीयों  की उपस्थिती काटोल संवाददाता – काटोल  विधान  सभा  के  युवक  कल्याण, पर्यटन,उद्योग,फलोत्पादन  विभाग  के समस्याओं को  हल  करने  के लिये  बुधवार  09फरवरी  को दोपहर  12-30बजे  काटोल  पं स के सभागृह  में  पर्यटन  विभाग  मातहत  में   महाराष्ट्र  के उद्योग, खनिकर्म, पर्यटन,खेल  तथा युवा कल्याण  विभाग  के राज्य  मंत्री  आदितीतटकरे  के मंत्रालय  के प्रमुख […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com