रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या ४० दुकानांवर मनपाची कारवाई  

ट्रॅफीक ऑफीस ते मुल रोडवर कारवाई  

चंद्रपूर – शहरातील रस्‍त्‍यांवर अस्‍थायी स्‍वरुपाचे अतिक्रमण असल्‍यामुळे रस्त्यांचा श्वास कोंडला आहे. हा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शहरातील ट्रॅफीक ऑफीस ते बंगाली कॅम्प ते मुल रोड येथील ४० दुकानांवर कारवाई करून साहीत्य जप्त केले आहे.

शहरातील वाहतुक कोंडी सोडविण्यास नागपूर रोड, बंगाली कॅम्प, गोल बाजार,दाताळा रोड,जटपुरा गेट ते रामनगर मार्ग या सर्व मार्गांवर मनपाद्वारे कारवाई केली जाणार असुन कारवाई दरम्यान रस्त्याच्या दोन्‍ही बाजुंनी असलेल्या फेरीवाल्यांच्या गाड्या हटविण्यात आल्या तर वारंवार अतिक्रमण करीत असल्यामुळे साहीत्य जप्ती करण्यात आले.रस्त्यांच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण हटवून फुटपाथ मोकळे करण्‍यात आले. 

या सर्व अस्‍थायी अतिक्रमण धारकांना आदल्या दिवशी अतिक्रमण हटविण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. मात्र २ मार्च रोजी सहायक आयुक्त,क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी पाहणी करीता गेले असता रस्त्यावर अतिक्रमण आढळुन आले. त्यामुळे येथील ४० दुकानांवर कारवाई करून साहीत्य जप्ती करण्यात आले आहे. रस्त्यावर व्यवसाय थाटणाऱ्या या सर्व दुकानांवर कारवाई करण्यात आली असुन पुढेही नियमित अंतराने कारवाई सुरु राहणार आहे.

अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबविण्याचा निर्णय मनपा आयुक्‍त विपिन पालीवाल यांनी घेतला आहे. रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होते. असा अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणधारकांवर कारवाईची मोहीम सुरू आहे.नागपूर रोड, बंगाली कॅम्प, गोल बाजार,जटपुरा गेट ते रामनगर मार्ग येथे रोडवरच दुकाने थाटली आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. दाताळा रोडवर भाजी विक्री करणारे रस्त्यावरच दुकान लावतात त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. अश्या विक्रेत्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे जागा उपलब्ध असल्याने त्यांनी तेथे बसण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.           मनपातर्फे नियमित नाली सफाई करण्यात येते मात्र काही नागरिकांकडून यात प्लास्टीक व तत्सम स्वरूपाचं कचरा टाकण्यात येतो यामुळे नाली बुजते तेव्हा अश्या नागरीकांवरही कारवाई केल्या जाणार आहे.तसेच रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवणाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली जाणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

परिश्रमाने जीवनात निश्चित ध्येयपूर्ती व्याख्याता डॉ. विजयता विटनकर यांचे प्रतिपादन

Thu Mar 2 , 2023
नागपूर: जीवनात यश मिळावे म्हणून आपण विचार करतो. आपण अनेकदा मध्येच थांबतो. मात्र, जीवनात निश्चित ध्येयपूर्ती ही केवळ परिश्रमानेच साध्य करता येत असल्याचे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. विजयता विटनकर यांनी केले. भारत सरकारचे युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, रासेयो प्रादेशिक संचालनालय यांच्या सौजन्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या यजमानाखाली गुरुनानक भवन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com