– कन्हान ला भक्तीमय वातावरणात नविन वर्षाला सुरूवात.
कन्हान :- श्री संत गजानन महाराज सेवा समिती, तीन खंबा चैक नागपुर व्दारे अठराव्या वर्षी संत गजानन महाराज पायी पालखी दिंडी यात्रेचे दुस-या दिवसी शनिवार (दि.४) जानेवारी ला सकाळी काली माता मंदीरातुन प्रस्थान होऊन कन्हान, कांद्री शहरा च्या मुख्य मार्गाने भ्रमण करित असताना भाविक भक्तानी भव्य स्वागत करून दर्शनाचा लाभ घेत पायदळ वारीतील भाविकांना, चाय, बिस्किट, उपहार, नास्ता, भेट वस्तु देऊन मनोभावे दर्शनाचा लाभ घेत श्री गजानन च्या भजन, अंभगाच्या निनांदाने कन्हान, कांद्री शहर दुमदुमले.
शुक्रवार (दि.३) जानेवारी २०२५ ला श्री हरिहर गजानन निवास, टिमकी, तीन खंबा चौक, नागपुर येथुन संत गजानन महाराज पायी पालखी दिंडी यात्रेचे प्रस्थान होऊन सायं ६ वा. काली माता मंदीर येथे पालखीचे आगमन होताच मॉ काली माता मंदीर सेवा ट्रस्ट, सत्रापुर कन्हान व्दारे भव्य स्वागत व सायं. ७ ते ८.३० किर्तन व नंतर महाप्रसाद आणि मुक्काम झाला . शनिवार (दि.४) जानेवारी ला सकाळी ७ वा पालखी काली मंदीरातुन प्रस्थान होऊन राष्ट्रीय महामार्गाने गणेश नगर, श्री हनुमान, गजानन मंदीर तीवाडे ले-आ ऊट येथुन पांधन रोडने आंबेडकर चौकातुन महामार्गा ने नगर प्रदक्षिणा करित स. ८ वा. श्री गजानन सॉ मिल, काकडे निवास येथे चाय नास्ता करून महामार्गा ने तारसा रोड चौक, शितला माता मंदीर जे एन रोड येथे स्वागत नंतर कांद्री वरून जे एन दवाखाना चौका तुन रूद्रा पेट्रोल पंप येथे अल्पोहार करून बोरडा – नगरधन मार्गे रामटेक कडे मार्गक्रमण केले.
श्री गजानन महाराज पायी पालखी दिंडी यात्रा कन्हान, कांद्री शहर भ्रमण करताना गणेश नगर येथील महिलांनी रांगोळी, फुले व आरती घेऊन पुजन केले. श्री हनुमान, गजानन मंदीर तीवाडे ले-आऊट येथे परिसरातील भाविकांनी दर्शन घेतले आणि सुर्यकांत तिडके व्दारे बिस्किट, फराळी पॉकेट वितरण केले. तारसा रोड चौकात धोटे मित्र परिवार तर्फे फुलाचा वर्षाव व भेट वस्तु वितरण केल्या, नंतर डोईजड, बेले व पोटभरे परिवारा तर्फे काफी, बिस्किट वितरण, शितला माता मंदीर कांद्री येथे बुंदी लाडु, सामोर ढोमणे व मौर्य परिवार व्दारे स्वागत करण्यात आले. सामोर कुंभलकर मित्र परिवार तर्फे भेट वस्तु दे़ऊन स्वागत तसेच धन्यवाद गेट पोटभरे निवास, कांद्री बस स्टाप सामोर कांद्री च्या भाविक नागरिका व्दारे पुष्प, बिस्किट, फराळी पॉकेट, चाय चे वितरण करण्यात आले. जे एन दवाखाना चौकात भडग परिवारा तर्फे पुजन नंतर बोरडा रोड वरील रूद्रा पेट्रोल पंप येथे अल्पोहार, भेट वस्तु वितरण करून स्वागत केले. नदंतर पालखी बोरडा रोड ने पुढे मार्गक्रमण करून सायंकाळी नगरधन येथे मुक्काम होणार आहे.