बोरडा रोडवर धारदार शस्त्राने मारून डी जे मालक कल्पेश ची हत्या.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान : – बनपुरी येथील कल्पेश भगवान बावनकुळे हा नागपुर वरून डि जे वाजवुन रात्री घरी दुचाकीने परत जात असताना बोरडा रोडवरील पेट्रोल पंप जव ळ दोन अज्ञात आरोपीने दुचाकी अडविल्याने दुचाकी सह खाली पडुन तिघेही उठुन पंपकडे पळत असताना कल्पेश ला पकडुन धारदार शस्त्राने मारून हत्या करि त आरोपी पळुन गेले. तर मागे स्वार दोघे मित्र पंप वर गेल्याने सुखरूप बचावले.

शनिवार (दि.१०) सप्टेंबर २०२२ ला नागपुर येथील गणेश विसर्जनात डि जे वाजवुन डिजे मालक कल्पेश भगवान बावनकुळे वय ३० वर्ष व डि जे ऑप रेटर सुरज सुनिल ढोबळे वय २२ वर्ष व हेल्पर जितेंद्र रमेश ढोबळे वय २४ वर्ष तिघेही राहणार बनपुरी. ता पारशिवनी हे नागपुर वरून रात्री ११.३० वाजता घरी बनपुरी ला दुचाकी क्र एम एच ४९ बी एल ५६२८ अँक्टीव्हा ने परत येत असताना कल्पेश दुचाकी चाल वित असुन दोघे मागे बसले होते. कन्हान वरून बोरडा रोडने जात असताना बोरडा रोडवरील पंप च्या थोड या सामोर काही अंतरावर नागपुर चारपदरी महामार्गा जवळ रात्री १२.३० वाजता दरम्यान दोन अज्ञात आरो पीने त्यांची दुचाकी अडविल्याने दुचाकीसह तिघेही खाली पडले व उठुन जिव वाचवुन पंप कडे पळताना दोन्ही आरोपीने कुठलेही कारण नसताना कल्पेश ला पकडुन धारदार शस्त्राने त्याच्या पोटावर, छातीवर, हातावर, गळयावर व पाठीवर मारून आरोपी पळुन गेले. तर मागे स्वार दोघे सुरज व जितेंद्र हे पंप वरील कर्मया-यासह घटनास्थळी जावुव पाहीले तर कल्पेश रक्तबंबाळ मृत अवस्थेत जमिनीवर पडला दिसल्याने घटनेची माहीती कन्हान पोलीस स्टेशन ला बनपुरी गावात सांगितल्याने घटनास्थळी कन्हान पोनि विलास काळे, सपोनि सतिश मेश्राम, हे कॉ नरेश वरखडे , वैभव बोरपल्ले, कोमल खैरे आदि पोलीसानी पोहचुन तपास सुरू केला. दोघे पंपवर धावत गेल्याने सुखरूप बचावले तर दोन अज्ञात आरोपीने कल्पेश बावनकुळे ला धारदार शस्त्राने मारून हत्या केल्याने कन्हान पोलीसानी अप क्र ५२५/२२ कलम ३४१, ३०२, ३४ भादंवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन बातमी लिहे पर्यंत हत्ये चे कारण कळु शकले नसून आरोपीचा शोध सुरू आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com