वुशू स्पर्धा
महावीर नगर मैदान
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील वुशू स्पर्धेत पहिल्याच दिवशी १४ वर्षाखालील वयोगटात विविध वजनगटात एस.एस. ॲकेडमीचा दबदबा राहिला. बुधवारी (ता.१८) महावीर नगर मैदानात सुरू असलेल्या स्पर्धेत २३ किलो वजनगटात मुले आणि मुलींमध्ये एस.एस.अकादमीने प्रथम स्थान पटकाविले. तर ४५ किलो, ४२किलो, २० आणि ३९ किलो वजनगटात मुलींमध्ये सुद्धा एस.एस. ॲकेडमीने बाजी मारली.
निकाल (प्रथम, द्वितीय व तृतीय)
वयोगट – १४ वर्षाखालील
वजनगट – २३ किलो
मुली
युगंधरा बावणे (एस.एस. ॲकेडमी), जीविका चौधरी (बॉक्स ऑन फायर ॲकेडमी), नॅन्सी ढोके (राणी दुर्गावती), सोनाक्षी हरगोडे (हिलफोर्ट)
मुले –
जीत प्रामाणिक, जय हलमारे (दोघे एस.एस. ॲकेडमी), रूनक गायकवाड (डीएसए ॲकेडमी), धैर्य डंभारे (बुटी पब्लिक स्कूल)
वजनगट – ४५ किलो
मुली –
राधा बावणे (एस.एस.ॲकेडमी), सिद्धी चरडे (सलामे कॉन्व्हेंट), आस्था चौधरी (एस. एस.ॲकेडमी), अंतरा धमगाये (गुरुकुल रामटेक)
मुले –
उपलक्ष कुंभारे (रामटेक), अर्णव धमगाये (राणी दुर्गावती), अमोघ गुई (बॉक्स ऑन फायर ॲकेडमी), मयूर सोनकुसरे (राणी दुर्गावती)
वजनगट – २० किलो
मुली –
शगुन खंदैतकर (डी.एस.ए. ॲकेडमी), श्रीवांशी यादव (वुशू स्टार ॲकेडमी), आर्या छपरे (हिलफोर्ट पब्लिक स्कूल), शिवस्वी भांगरे (एस.एस. ॲकेडमी)
मुले-
शिवांश यादव (पारशिवनी), शौर्य राऊत (डी.एस.ए.ॲकेडमी), अरकांत पठाण (बॉक्स फायर ॲकेडमी), हृदय सोनटक्के (राणी दुर्गावती)
वजनगट – ४२ किलो
मुली –
जानवी आखोडे (एस.एस.ॲकेडमी), संस्कृती भोपचे (एस.टी कॅलरेट स्कूल), नंदिनी डोंगरे (राणी दुर्गावती), योगिता सोनाथे (आशानी मारती आर्ट)
मुले-
सौरभ कावळे (राणी दुर्गावती), तन्मय बिटुकले (टायटन क्लयष्य क्लब), वेदांत छत्रीय (राणी दुर्गावती), प्रथम व-हाडकर (हिल फोर्ट)
वजनगट – ३९ किलो
मुली –
शभा शेख (एस.एस.ॲकेडमी), वैष्णवी मोहाडेकर, रिधिमा आटे, रिया अखार (तिघी राणी दुर्गावती).
मुले –
लोकेश गावंडे (टायटन वुशू क्लब), सनी शर्मा (मदन गोपाल स्कूल), पलाश तलमले (एस. वॉरीयर), आशिष धाकड (राणी दुर्गावती स्कूल).