खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आज,खासदार कंगना रणौत यांची उपस्थिती

नागपूर :- नागपूर आणि विदर्भातील खेळाडूंसाठी महत्वाचे व्यासपीठ ठरलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या सातव्या पर्वाला रविवार १२ जानेवारी २०२५ रोजी सुरुवात होत आहे. खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत व खासदार, सिने अभिनेत्री कंगना रणौत यांच्या विशेष उपस्थितीत रविवारी १२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता यशवंत स्टेडियम येथे महोत्सवाचा शुभारंभ होईल. मान्यवर अतिथींच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित केली जाईल. यावेळी खासदार क्रीडा महोत्सवाचे ध्वजारोहण होईल, अशी माहिती खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर यांनी शनिवारी (ता.११) पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी डॉ. पद्माकर चारमोडे, प्रकाश चांद्रायण, सचिन देशमुख, अशफाक शेख, सतिश वडे, लक्ष्मीकांत किरपाने, नवनीतसिंग तुली, विनय उपासनी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या सातव्या पर्वाचे आयोजन १२ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या २० दिवसांमध्ये शहरातील ७३ क्रीडांगणांवर ५८ खेळ खेळले जातील. यात विविध ५८ खेळांच्या तब्बल २९०० चमू, ६००० ऑफिसियल्स, ८० हजार खेळाडूंचा समावेश असेल. एकूण १३१०० स्पर्धा खेळविण्यात येणार असून यात खेळाडूंना १२३१७ मेडल्स आणि ७६२ ट्रॉफी देण्यात येतील. स्पर्धेतील विजेत्यांना १ कोटी ५० लक्ष रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात येणार आहेत.

रविवारी १२ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजता यशवंत स्टेडियम येथून मॅरेथॉन आणि सकाळी ६.३० वाजता युवा दौडला सुरूवात होणार आहे. यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व खासदार, सिने अभिनेत्री कंगना रणौत व अन्य मान्यवर अतिथींच्या हस्ते खासदार क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ होईल. मॅरेथॉन पुरूष, महिला आणि १६ वर्षाखालील मुले व मुली या गटामध्ये होणार आहे तर ३ किमी अंतराची युवा दौड सर्वांसाठी खुली असणार आहे. युवा दौडमध्ये सहभागी प्रत्येक स्पर्धकाला मेडल्स, प्रमाणपत्र आणि टी-शर्ट प्रदान करण्यात येणार आहे.

महोत्सवाच्या आयोजनासाठी खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी, सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, कोषाध्यक्ष आशीष मुकीम, नागेश सहारे, डॉ. पद्माकर चारमोडे, डॉ. संभाजी भोसले, डॉ. विवेक अवसरे, सचिन देशमुख, अशफाक शेख, अमित संपत, सतिश वडे, सचिन माथने, सुनील मानेकर, लक्ष्मीकांत किरपाने, डॉ. सौरभ मोहोड, रमेश भंडारी, प्रकाश चांद्रायण, नवनीतसिंग तुली आदी परिश्रम घेत आहेत.

खासदार क्रीडा महोत्सवाचे वेळापत्रक

12 जानेवारी 2025 पासून

खो-खो (विदर्भ स्तरीय), ऍथलेटिकस, कबड्डी (विदर्भ स्तरीय), सॉफ्टबॉल, बास्केटबॉल

13 जानेवारी 2025 पासून

टेनिस बॉल क्रिकेट, प्रोफेशनल टेनिस बॉल क्रिकेट, ज्युडो (विदर्भ स्तरीय), बॅडमिंटन (विदर्भ स्तरीय), पंजा कुस्ती, लॉन टेनिस

15 जानेवारी 2025 पासून

तलवारबाजी, वुशू, तायक्वांडो

16 जानेवारी 2025 पासून

तिरंदाजी, मल्लखांब, रस्सीखेच, व्हॉलिबॉल

17 जानेवारी 2025 पासून

टेबल टेनिस

18 जानेवारी 2025 पासून

ब्रिज, हॉकी, हँडबॉल (विदर्भ स्तरीय), जलतरण

19 जानेवारी 2025 पासून

सायकलिंग (विदर्भ स्तरीय), क्वान की डो मार्शल आर्ट

20 जानेवारी 2025 पासून

मास्टर ऍथलेटिक्स, आट्या पाट्या, रायफल शूटिंग, ट्रायथलॉन

22 जानेवारी 2025 पासून

अष्टेडू, दिव्यांग स्पर्धा, बॉक्सिंग

23 जानेवारी 2025 पासून

कुस्ती, लेदर बॉल क्रिकेट, कॅरम राज्य मानांकित, कोशिकी मटेरियल आर्ट, कराटे, मिनी गोल्फ

24 जानेवारी 2025 पासून

व्हॉलिबॉल जिल्हा आंतर क्लब, बुद्धिबळ, थ्रो बॉल, फ्लोअर बॉल, लंगडी

25 जानेवारी 2025 पासून

रोप स्किपींग, ज्येष्ठ नागरिक स्पर्धा

26 जानेवारी 2025 पासून

स्केटिंग, बॉडी बिल्डिंग (विदर्भ स्तरीय)

27 जानेवारी 2025 पासून

बेंच प्रेस पॉवरलिफ्टिंग, किड्स क्रॉस कंट्री, पिट्टू, ओ वूमनिया,

ऍरोबिक्स अँड फिटनेस

28 जानेवारी 2025 पासून

मल्लविद्या

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गट ग्रामपंचायत घोटमुंढरी येथे अंगणवाडी बांधकाम भूमिपूजन

Sun Jan 12 , 2025
कोदामेंढी :- खात रेवराल जि प क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत घोटमुंढरी येथे अंगणवाडी बांधकाम भूमिपूजन जि प सदस्य राधा मुकेश अग्रवाल यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी जि प सदस्य राधा मुकेश अग्रवाल, प स सदस्या दुर्गा ठाकरे, माजी प स सदस्य मुकेश अग्रवाल, सरपंच चंदा गेडाम , उपसरपंच श्याम वाडीभस्मे, ग्रा.पं.सदस्यगण विलास पटले, शंकर पटले, मोसमी घरडे, पुजा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!