मंगळवार, 10 जानेवारी 2023
विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर
नागपूर :- खासदार क्रीडा महोत्सव 2023 अंतर्गत विदर्भस्तरीय खो-खो स्पर्धेच्या दुस-या दिवशी मंगळवारी (ता.10) महिला गटात नव जयहिंद यवतमाळ, मराठा फ्रेन्ड्स अमरावती संघाने विजयी आगेकूच केली. सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात नव जयहिंद यवतमाळ (11) संघाने विदर्भ क्रीडा मंडळ नागपूर (4) संघाचा 7 गुणांनी पराभव केला. तर मराठा फ्रेन्ड्स अमरावती (12) संघाने तुळजाई क्रीडा मंडळ यवतमाळ (5) संघावर 7 गुणांनी विजय मिळविला.
पुरूष गटात राजापेठ स्पोर्टींग अमरावती आणि नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर संघाने विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. राजापेठ स्पोर्टींग संघाने (15) कोराडी येथील आई जगदंबा क्रीडा मंडळ (5) संघाचा तब्बल 11 गुणांनी पराभव केला. तर नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर (20) संघाने विवेकानंद क्रीडा मंडळ देउळगाव घुबे (11) संघावर 9 गुणांनी विजय मिळविला.
निकाल : (सकाळच्या सत्रातील सामने)
महिला –
1. छत्रपती युवक क्रीडा मंडळ नागपूर (14) महाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर (06)
छत्रपती युवक नागपूर 8 गुणांनी विजयी
2. नव जयहिंद यवतमाळ (11) वि. विदर्भ क्रीडा मंडळ नागपूर (04)
नव जयहिंद यवतमाळ 7 गुणांनी विजयी
3. मराठा फ्रेन्ड्स अमरावती (12) वि. तुळजाई क्रीडा मंडळ परतवाडा (05)
मराठा फ्रेन्ड्स 7 गुणांनी विजयी
4. विदर्भ क्रीडा मंडळ काटोल (10) वि. रामनगर स्पोर्टींग वर्धा (02)
विदर्भ क्रीडा मंडळ 8 गुणांनी विजयी
5. तालुका क्रीडा संकुल वरोरा (10) वि. विवेकानंद क्रीडा मंडळ देउळगाव घुबे (05)
तालुका क्रीडा संकुल 5 गुणांनी विजयी
6. क्रांती ज्योती क्रीडा मंडळ चंद्रपूर (12) वि. विदर्भ युथ क्रीडा मंडळ काटोल (10)
क्रांती ज्योती क्रीडा मंडळ 2 गुणानी विजयी
7. अनंता क्रीडा मंडळ अकोला (14) वि. नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर (06)
अनंता क्रीडा मंडळ 8 गुणानी विजयी
8. छत्रपती युवक क्रीडा मंडळ नागपूर – बी (11) वि. एस.एस.पी.एम. वर्धा (05)
छत्रपती युवक क्रीडा मंडळ 6 गुणानी विजयी
पुरूष –
9. महाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर (16) वि. न्यू विदर्भ क्रीडा मंडळ पवनी (11)
महाराष्ट्र क्रीडा मंडळ 5 गुणांनी विजयी
10. राजापेठ स्पोर्टींग अमरावती (15) वि. आई जगदंबा क्रीडा मंडळ, कोराडी (04)
राजापेठ स्पोर्टींग अमरावती 11 गुणांनी विजयी
11. नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर (20) वि. विवेकानंद क्रीडा मंडळ देउळगाव घुबे (11)
नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ 9 गुणांनी विजयी
12. नव जयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ (17) वि. सिपना अंबादेवी चिखलदरा (05)
नव जयहिंद क्रीडा मंडळ 12 गुणांनी विजयी