खासदार धिरज साहू हा ‘कॉंग्रेस’ची एटीएम मशीन, कोट्यावधीचे घबाड पकडल्यानंतर ‘देशासाठी दान’ मोहीम – जयदीप कवाडे

मुंबई/नागपुर :-काँग्रेसने ‘डोनेट फॉर देश’ नावाने क्राऊड फंडिंग मोहीम सुरू केली आहे. खर तर हे देशासाठी दान नसून हे गांधी परिवारला निधी संकलन करून देण्याची मोहीम आहे. कारण काँग्रेस खासदार धीरज शाहू हे गांधी परिवाराचे एटीएम असून पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या महायुती सरकारने त्यांचे साडेतीनशेच्या वर कोटीचे घबाड उघड केले. त्यामुळे आता गांधी परिवाराकडे पैसे उरले नाही. त्यामुळे कॉंग्रेसच्या स्थापनादिनाचे माध्यम घेऊन देशात सुरू करण्यात आलेली ‘डोनेट फॉर नेशन’ अभियान हे फक्त गांधी परिवारकरिता संकलन करणारा प्रयोग आहे, अशी प्रतिक्रीया पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप भाई कवाडे यांनी केले. प्रसिद्धी पत्रकाद्वारे बोलताना जयदीप कवाडे यांनी सांगितले की, कॉंग्रेस पक्ष आज लोकांकडून ऑनलाइन देणगी घेत आहे. परंतु, आज आपल्या खासदाराला पैसे लुटताना पकडल्यानंतर काँग्रेसने डोनेट फॉर डायनेस्टी ही नवीन योजना आणली आहे. एकेकाळी सोन्याच्या ताठात जगण्याची सवय असलेल्या गांधी परिवाराची जीवनशैलीचा खर्च भागविणसाठी ही योजना आणली आहे.

निधी गोळा करण्यासाठी घेतलेली आम सभा

खासदार धीरज साहू यांच्या लपवलेल्या ३५३ कोटी रुपयांची रोकड सापडल्यानंतर आता त्यांच्या बॅंकेत पैसे उरले नाहीत. काँग्रेसच्या डोनेट फॉर द कंट्री मोहिमेतून पक्षातील कार्यकर्त्यांवर बळजबरी करण्याचे काम ते करीत आहे. आज ‘है तैयार हम’ रैली फक्त निधी गोळा करण्यासाठी घेतलेली आम सभा आहे. रॅलीला सुमारे 10 लाखांची उपस्थिती राहिल असा दवा काँग्रेसने केला होता. महारॅली होत असलेल्या ठिकाणी केवळ 50 हजार लोक बसू शकतील एवढेच मैदान आहे. यातून सभेत 10 लाख लोकांची उपस्थितीचा दावा फोल ठरला. कुठून तरी लोकांना भूलथापा देऊ देऊ त्यांनी गर्दी गोळा करण्याचा प्रयत्न केल्याचेही जयदीप कवाडे यावेळी म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पंढरपुर मंदिर समिति के भ्रष्टाचार की जांच ‘एस.आई.टी.’ से कराएं ! - महाराष्ट्र मंदिर महासंघ की मांग

Fri Dec 29 , 2023
– श्री विट्ठल के प्राचीन अलंकारों का मूल्यांकन एवं उसकी प्रविष्टि न करना, बडा घोटाला ! – प्रसाद के लड्डू से लेकर, गोशाला, शौचालय, अग्रिम राशि सर्वत्र ही अनियमितताएं ! पंढरपुर :- महाराष्ट्र सरकार द्वारा नियंत्रित श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान में प्राचीन एवं मूल्यवान सोने-चांदी के अलंकार गायब होने की घटना हाल ही में सामने आई । कुछ वर्ष पूर्व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com