विजयश्री खेचून आनल्याबद्दल शिंदे ,पटोले, केदार यांचे हस्ते खासदार बर्वे यांचा सत्कार

– सुनिल केदार यांनी “वनमॅन आर्मी” ची भुमीका निभावत रामटेकात फडकविला झेंडा

 नागपूर :- नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचेउमेदवार बबलू उर्फ श्याम बर्वे नी शिवसेना भाजप युतीच्या उमेदवार राजु पारवेचा पराजय करीत यश संपादन केले.टिळक भवन,मुंबई येथे काँग्रेस पक्षाच्या नवनियुक्त खासदारांची बैठकीला उपस्थिती दर्शवली प्रसंगी नवनियुक्त खासदारांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व प्रभारी रमेश चेन्नीथला ,सुशील कुमार शिंदे माजी मुख्यमंत्री ,विजय वडेट्टीवार (वीरोधी पक्ष नेता) सुनील केदार माजी मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत रामटेक लोकसभा मतदान संघात विजयश्री खेचून आणल्या बद्दल मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला.

रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेस मागील दहा वर्षांपासून पिछाडीवर होती. काँग्रेस करीता ही लोकसभा निवडणुक सहज नसल्याने या ठिकाणी युतीच्या उमेदवार हमखास निवडुन येईल असे असताना काँग्रेस या क्षेत्रात सुनिल केदार यांनी “वन मॅन आर्मी” ची भुमीका निभावत ही निवडणुक खांद्यावर घेत गाव नी गाव,खेडेपाडे पिजुन काहडले. रात्रंदिवस मतदारांच्या भेटी घेत ही निवडणुक चुरशिची केली. कोणताही पक्षाच्या मोठा नेता या भागात काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला आला नाही. तरीही सुनिल केदारानी आपले सैन्य या निवडणुकीत कामाला लावले. जिंकायच्या प्रण मनात घेऊन नियोजन केले. तया दुपटिने आखनी करून प्रचार केला.जिल्हा परिषद चे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते, गावागावात प्रचाराच्या कामात लावले व विजय खेचून आणला हे विशेष.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पुढील पाच दिवसात महाराष्ट्र, कर्नाटकच्या किनारी आणि उत्तरेकडील अंतर्गत भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

Sat Jun 8 , 2024
– नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच: • नैऋत्य मोसमी पाऊस मध्यवर्ती अरबी समुद्र, दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणचे आणखी काही भाग आणि दक्षिण छत्तीसगड आणि दक्षिण ओदिशाचे काही भाग आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या आणखी काही भागात आज 8 जून 2024 रोजी पुढे सरकला आहे. • मध्यवर्ती अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये, महाराष्ट्र (मुंबईसह) आणि तेलंगणच्या आणखी काही भागात पुढील 2-3 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com