*महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड*
(नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करारावर स्वाक्षरी
नागपूर :- नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, आज विधान भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय (MoHUA), महा मेट्रो आणि आशियाई विकास बँक (ADB) यांच्यात 200 मिलियन USD (जपानी येन) निधीसाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
या सामंजस्य करारावर महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हार्डीकर आणि ADB च्या कंट्री डायरेक्टर मियो ओका यांनी स्वाक्षऱ्या केल्या. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव शिखर परदेशी आणि अन्य मान्यवर या वेळी उपस्थित होते.
महा मेट्रोचे संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) अनिल कोकाटे, संचालक (आर्थिक) हरेंद्र पांडे तसेच ADB चे प्रिन्सिपल ट्रान्सपोर्ट स्पेशलिस्ट शरद सक्सेना आणि सीनियर प्रोग्राम ऑफिसर अनुराग सिन्हा यांनीही प्रमुख उपस्थिती दर्शवली.
भारतीय रुपयांत ही रक्कम अंदाजे ₹1,530 कोटी इतकी आहे. ADB ने या प्रकल्पासाठी कमी व्याजदरावर निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. नागपूर मेट्रो फेज-II हा ADB, युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक (EIB) तसेच केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक सहभागातून उभारला जाणार आहे.
*नागपूर मेट्रो फेज-II चा विस्तार:*
फेज-II मध्ये एकूण 43.8 किमी लांबीच्या 32 मेट्रो स्थानकांचा समावेश असून हा टप्पा नागपूर शहराच्या उपनगरांपर्यंत विस्तारित होणार आहे. याचा भूमिपूजन व पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम 11 डिसेंबर 2022 रोजी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला होता.
*प्रमुख मार्ग व स्थानके:*
1. *खापरी ते MIDC ESR* (18.5 किमी, 10 स्थानके)
– ईको पार्क, मेट्रो सिटी, अशोक वन, डोंगरगाव, मोघाव, मेघदूत CIDCO, बुटीबोरी पोलीस स्टेशन, म्हाडा कॉलनी, MIDC KEC, MIDC ESR
2. *प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्ट नगर* (5.6 किमी, 3 स्थानके)
– पारडी, कापसी खुर्द, ट्रान्सपोर्ट नगर
3. *ऑटोमोटिव्ह स्क्वेअर ते कान्हान* (13 किमी, 12 स्थानके)
– पिली नदी, खासरा फाटा, ऑल इंडिया रेडिओ, खेरी फाटा, लोकविहार, लेखा नगर, कँटोन्मेंट, कंम्प्टी पोलीस स्टेशन, गोल्फ क्लब, कान्हान नदी
4. *लोकमान्य नगर ते हिंगणा* (6.7 किमी, 7 स्थानके)
– हिंगणा माउंट व्ह्यू, राजीव नगर, वानाडोंगरी, APMC, रायपूर, हिंगणा बस स्टँड, हिंगणा
*रायडरशिप आणि भविष्यातील महत्त्व:*
फेज-I च्या रायडरशिपने 1 लाखाचा टप्पा ओलांडला असून, फेज-II च्या विस्तारामुळे नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागांशी उत्तम कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे. यामुळे मेट्रो प्रवाशांची संख्या लक्षणीयरीत्या वाढणार आहे.