– पोलीस स्टेशन रामटेक जि. नागपुर (ग्रा.)
रामटेक :- स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणचे पथकास रामटेक उपविभागात पो.स्टे. रामटेक हद्दीत पेट्रोलींग दरम्यान खबर मिळाली कि, काचूरवाही गावातील राजेंद्र बावनकुळे याच्या कडे चोरीच्या ४ पाण्याच्या मोटारपंप ठेवल्या आहे. या बातमी वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेड कारवाई करून आरोपी नामे राजेंद्र मधुकर बावनकुळे वय ३३ वर्ष, रा. काचुरवाही त. रामटेक याचे कुक्कुट पालनाच्या झोपड्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यातून १) ५ एच पि ची मोटारपंप किंमती १५०००/-रू. २) ३ एच पि ची मोटारपंप किंमती १०,०००/- रू ३) ३ एच पि ची मोटारपंप किंमती १००००/-रू. ४) २ एच पि ची मोटारपंप किंमती ७०००/- रू. असा एकूण ४२०००/- रु. चा मुद्देमाल जप्त करून पोस्टे रामटेक येथील अप. क्र. ८५४/२३ कलम ३७९ भादंवि, मोटारपंप चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. जप्त मुद्देमाल व कागदपत्रे पुढील कायदेशीर प्रक्रिये करीता पोलीस ठाणे रामटेक यांचे ताब्यात देण्यात आले. सदरची कारवाई हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण, रमेश धुमाळ, अपर पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक किशोर शेलकी, पोलीस हवालदार रोशन काळे, नितेश पीपरोदे, उमेश फुलवेल, शंकर मडावी, पोलीस नायक वीरेंद्र नरड, विपीन गायधने, चालक पोहवा अमोल कुशे यांनी पार पाडली.