२ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई
नागपूर, ता. २० : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता. २० डिसेंबर) प्लस्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजा संदर्भात दोन झोनमध्ये कारवाई केली. लक्ष्मीनगर आणि सतरंजीपुरा झोनमधील ४१ पतंग दुकानांची तपासणी करुन ८५ प्लास्टिक पतंग आणि ३ नॉयलॉन मांजा जप्त करण्यात आले. तसेच रु. ७,०००/- चा दंड ही लावण्यात आला. उपद्रव शोध पथकाद्वारे २ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १५,००० चा दंड वसूल करण्यात आला. पथकाने २५ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.