नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता. ६ डिसेंबर) रोजी ०७ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ३५,००० चा दंड वसूल केला. पथकाने ४९ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. त्यांनी मनपाच्या लसीकरणाबद्दल नियमांची माहिती दिली आणि सांगितले की लसीचे डोज घेणा-यांनाच प्रवेश दयावा अन्यथा कारवाईस पात्र राहतील.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)