-३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता. २७ डिसेंबर) रोजी प्लास्टिक पतंगच्या विरोधात कारवाई करीत १०० प्लास्टिक पतंग जप्त केली. या कारवाईत ५,०००/- रुपये दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाद्वारे लक्ष्मीनगर झोनमधील ७ पतंग दुकानांची तपासणी करुन १०० प्लास्टिक पतंग जप्त करण्यात आले. शोध पथकाने १० झोन मध्ये ५२ दुकानांची तपासणी केली.
याशिवाय उपद्रव शोध पथकाने ३ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १५,००० चा दंड वसूल केला. पथकाने ३१ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली