नागपूर :- पोलीस ठाणे तहसिल हद्दीत राहणाऱ्या ३१ वर्षीय फिर्यादी हया आपल्या मुलीला ट्युशन मधुन घरी परत आणण्याकरीता जात असतांना, आरोपी स्प्लेंडर गाडी क. एम. एच ३१ वी.एस ४९३४ चे चालक नामे राजेश उर्फ राजा सुंदरलाल ढोके वय ४७ वर्ष रा. तहसिल, नागपूर याने फिर्यादीचे मागुन येवुन फिर्यादी सोबत तिला लज्जा येईल असे कृत्य करून फिर्यादीचा विनयभंग केला.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तफारीवरून पोलीस ठाणे तहसिल येथे पोउपनि, सिरसाठ यांनी आरोपीविरूध्द कलम ७४, ७५(१) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.