संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– मोकाट जनावरांचा बंदोबस्त लावण्याची शेतक-यांची मागणी.
कन्हान :- वाघधरे वाडी व खंडाळा येतील शेतक-यां च्या शेतात एम जी नगरातील मोकाट गु-हे ढोरे येऊन शेतातील पिक खाऊन शेतक-यांचे नेहमी नुकसान करित असल्याने शेतक-यांनी मोकाट गु-हे, ढोरे ठेवणा-या जनावरांच्या मालकाना समजावुन न मानल्यास योग्य कारवाई करून मोकाट जनावरांचा बंदोबस्त लावण्याची मागणी केली आहे.
एम जी नगर कन्हान येथिल गु-हे, ढोरे दिवस रात्र मोकाट सोडत असल्याने ही जनावरे वाघधरे वाडी व खंडाळा शेत शिवारातील माळवान व फुलाच्या शेती मध्ये चरून शेतमालाचे भयंकर नुकसान करित आहे. या मोकाट जनावरांच्या मालकाना समाजावुन सांगित ले तरी सुध्दा त्याचे जनावरे मेकाट राहत असल्याने शेत पिकाच्या नुकसानीमुळे येथिल शेतकरी त्रस्त झाल्याने सर्व शेतक-यांनी मा. तहसिलदार पारशिवनी हयाना लेखी निवेदन देऊन या मोकाट जनावरांच्या मालकाना व्यवस्थित समजावुन न मानल्यास योग्य ती कारवाई करून मोकाट जनावरांचा बंदोबस्त लावुन शेत पिकाचे होणारे नुकसान वाचवुन शेतक-याना न्याय द्यावा. अशी विनंती सुरेश कुंभलकर, रत्नाकर घारड, प्रकाश आंबेडकर, धनराज घारड, उमाकांत हटवार, कैलास कुंभलकर, खेमराज चौधरी, युवराज घारड, वसंता घारड, प्रकाश चकोले, विठोबा घारड, सारनाथ वाघधरे, रमेश चाकोले, गौरीप्रसाद वाघधरे, मोहन पटेल, मीलिंद वाघधरे, अशोक नेवारे, अशोक बनकर, ताराचंद चकोले सह वाघधरे वाडी व खंडाळा येथिल शेतक-यांनी केली आहे.