मोकाट जनावरांच्या विषयावर नगरसेविका डॉ.फुके यांनी प्रशासनास धरले वेठीस

नागपुर : दि.३१ डिसेंबर रोजी वर्षाअखेरिस झालेल्या मनपा च्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेविका डॉ.परिणीता फुके यांनी नागपुर शहरातील मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाअंतर्गत पशु वैद्यकीय सेवा कक्ष कार्यरत अधिकाऱ्याना वेठीस धरले.या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेविका डॉ. परिणीता फुके यांनी नागपुर शहरात ठिकठिकाणी मोकाट जानवरे फिरत असतात यावर काय कार्यवाही करण्यात आली, या जनावरांमुळे जर अपघात झाला तर जबाबदार कोण,आजपर्यंत किती जनावरांच्या मालकांवर कार्यवाही झाली, त्या कार्यवाहीचे स्वरूप काय, यांना कोणत्या दराने दंड आकारण्यात आले,नागपुर शहरातील वाढत्या कुत्र्याच्या संख्येत मनपा तर्फे काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत का तसेच कुत्र्यांची नसबंदी मोहिम सुरु करण्याबाबत अशा अनेक घनाघाती प्रश्न मांडून मनपा प्रशासनास वेठीस ठेवले.
विशेष करून नगरसेविका डॉ. फुके यांनी सन २०१८ पासून कुत्र्यांची नसबंदी मोहिम सुरु नसल्यामुळे याबाबत सर्वांचे लक्ष केंद्रित केले व राज्यशासन कडून ही मोहिम सुरु करण्याबाबत लवकरात लवकर निधि उपलब्धतेबाबत मनपा आयुक्त तर्फे निविदा मंजूरी करिता विनंती केली. तसेच हल्ली नगरसेविका यांच्या प्रभागातील अभ्यंकर नगर परिसरात मागील काही दिवसाअगोदर कु.सान्वी या ८ वर्षाच्या मुलीवर कुत्र्यांनी हल्ला करून गंभीररित्या जख्मी केले होते. या विषयावर सर्वच अधिकारी यांची कान उघाड़नी केली.
या सर्व प्रश्नांवर शहरातील सर्व नगरसेवकांनी आपली हामी दिली असता मा.महापौर श्री. दयाशंकर तिवारी व मा.आयुक्त बी. राधाकृष्णन यांनी समस्त अधिकाऱ्यांना ताबड़तोब कार्यवाहीचे आदेश दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

स्टेशनरी घोटाळ्यात ॲड.मेश्राम यांनी घेतले प्रशासनाला फैलावर

Sat Jan 1 , 2022
नागपूर – नागपूर महानगरपालिकेमध्ये गाजत असलेल्या स्टेशनरी घोटाळ्याच्या विषयावरून नगरसेवक व भाजपाचे प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले. ४१ बिलांवरून ६७ लक्ष रुपये संबंधित कंत्राटदारांना अदा करण्यात आल्याच्या प्रकरणामध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांच्याद्वारे तक्रार नोंदविण्यात आली. या संपूर्ण प्रकरणातील कंत्राटदाराद्वारे वेगवेगळ्या नावाच्या कंपन्यांद्वारे मनपात कंत्राट मिळविल्याचे पुढे आले. ४० वर्षापासून एकाच परिवारातील सदस्यांनी वेगवेगळ्या पाच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com