आधुनिक न्यायवैद्यक तंत्रज्ञान काळाची गरज – माजी लोकायुक्त एम. एल. टहलियानी

मुंबई : आजच्या युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातुलनेत गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींना प्रतिबंध घालण्यासाठी आधुनिक न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) तंत्रज्ञान ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तथा राज्याचे माजी लोकायुक्त एम. एल.टहलियानी यांनी केले.

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त न्याय सहाय्यक संस्थेच्यावतीने वार्षिक राष्ट्रीय न्यायसहायक विज्ञान प्रदर्शनाचे (नॅशनल फॉरेन्सिक एक्सपो- 2023) मुंबईत आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ.होमी भाभा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत, न्याय सहाय्यक भौतिकशास्त्र विभागप्रमुख ना. फटागरे, डॉ होमी भाभा विद्यापीठाचे अविनाश दलाल, माजी आमदार अतुल शाह यांच्यासह महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

माजी लोकायुक्त टहलियानी म्हणाले की, पुढील काळात न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) तंत्रज्ञानाला खूप महत्व असणार आहे. गुन्हेगार आपला पुरावा मागे राहू नये यासाठी प्रयत्न करत असतो. पुरावे नष्ट करण्यासाठी तो प्रयत्नशील असतो. अशा प्रकारचे गुन्हेगार शोधण्यासाठी हे तंत्रज्ञान खूप गरजेचे आहे. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होण्यासाठी फॉरेन्सिक तंत्रज्ञान उपयोगी पडेल आणि अनेक प्रकरणांचा उलगडा होईल. न्यायवैद्यक अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून अहवाल देताना स्पष्टता आणि पारदर्शक दिला पाहिजे. 26/11 च्या दहशतवादी हल्ला प्रकरणांमध्ये न्यायवैद्यक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने फायदा झाला, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

न्यायवैद्यक तंत्रज्ञानाची न्यायदानात महत्वाची भूमिका

 – कुलगुरू डॉ. रजनीश कामत

राष्ट्रीय विज्ञान दिवस हा महत्वाचा दिवस असून या दिवसाची यावर्षीची संकल्पना ‘वैश्विक कल्याणासाठी वैश्विक विज्ञान’ (ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबिइग) अशी आहे. न्याय व्यवस्थेत न्यायवैद्यक तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावत आहे. आज सायबर गुन्हेगारीत वाढ होतांना दिसत आहे, असे गुन्हे घडू नयेत म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका खूप महत्वाची ठरणार आहे. आज बरेच लोक तंत्रज्ञानचा वापर करत आहेत. निर्भया प्रकरणामध्ये न्यायवैद्यक तंत्रज्ञानाच्या वापरमुळे फायदा झाला. तंत्रज्ञान वापरण्याबाबत नागरिकांना जागरूक केले पाहिजे, असे कुलगुरु डॉ.कामत यांनी सांगितले.

गुन्हे स्थळ दृश्य पुनर्रचना, छाप पुरावे, रक्त नमुना विश्लेषण, आपत्ती प्रकरणातील व्यक्तींची ओळख, मृत्यू वेळेचा अंदाज, वैज्ञानिक तंत्र, फसवणुकीचा शोध, शोध आणि विश्लेषण, विष आणि औषधे, पेंट आणि काचेचे विश्लेषण, प्रयोगशाळा प्रणाली आदी विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली.

सायबर विभागाकडून 20 मिनिटांचा ऑनलाईन शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम याठिकाणी ठेवण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळातर्फे अनुदान, बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Wed Mar 1 , 2023
मुंबई : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, या संस्थेच्या अनुदान आणि बीजभांडवल योजनेच्या अनुदानासाठी चर्मकार समाजातील बेरोजगार युवक-युवतींनी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे मुंबई शहर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. या योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जातात. सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजना आणि बीजभांडवल योजना कर्ज प्रस्तावाचे अर्ज 9 मार्च 2023 पर्यंत वाटप करण्यात येणार आहेत. तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com