संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी 18 व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर कामठी विधानसभा मतदार संघात निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.रामटेक लोकसभा निवडणूक ही 19 एप्रिल ला होणार असून रामटेक लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेले कामठी विधानसभा मतदार संघातील प्रशासन सज्ज असून निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकारी विपीन इटनकर, कामठी विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गोसावी ,तहसिलदार गणेश जगदाडे यांच्या मार्गदर्शनार्थ कामठी नगर परिषद सभागृहात आदर्श आचारसंहीता नियंत्रण कक्ष उभारले असून या कक्षाचे प्रमुख नोडल अधिकारी म्हणून कामठी नगर परिषदचे प्रशासक संदीप बोरकर कर्तव्यदक्ष भूमिका साकारत आहेत.
19 एप्रिल 2024 रोजा होणाऱ्या रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी कामठी विधानसभा सज्ज निवडणूक विभाग पूर्णपणे सज्ज आहे.रामटेक लोकसभा मतदार संघ अंतर्गत सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे ज्यामध्ये काटोल, सावनेर, हिंगणा, उमरेड,कामठी व रामटेक चा समावेश आहे हे सहाही विधानसभा मतदार संघातील एकूण मतदार संख्या ही 20 लक्ष 46 हजार 435 आहे त्यात कामठी विधानसभा मतदार संघात 4 लक्ष 65 हजार 399 मतदारांचा समावेश आहे.त्यात 2 लक्ष 35 हजार 71 पुरुष,2 लक्ष 30 हजार 313 स्त्री मतदार तर 15 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.कामठी विधानसभा मतदार संघात एकूण मतदान केंद्राची संख्या 508 आहे .85 व त्यापेक्षा जास्त वय असलेले मतदार तसेच 40 टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सदर सुविधेचा लाभ घेण्यासाठी संबंधित मतदारास 12 डी नमुना परिपूर्ण भरून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.
कामठी नगर परिषद सभागृहात आदर्श आचार संहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे.यामध्ये नोडल अधिकारी संदीप बोरकर यांच्या अंतर्गत जवळपास 20 च्या आत कर्मचारी कार्यरत आहेत.या आचार संहिता कक्षातून आचार संहिता,एक खिडकी,सभा वाहन परवानगी,आदींचा कक्ष आहेत.अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने रामटेक लोकसभा निवडणुकीचे कामे सुरू असून येत्या 19 एप्रिल ला मतदान प्रक्रियेसाठी कामठी विधानसभा मतदार संघ सज्ज झाले असल्याची माहिती आदर्श आचारसंहिता कक्ष चे प्रमुख नोडल अधिकारी संदीप बोरकर, आबासाहेब मुढे, विक्रम चव्हाण, प्रदीप भोकरे, विजय मेथीयां यांनी दिली आहे.तसेच तक्रार निवारण /मदत कक्षाचा टोल फ्री क्रमांक 1950 आहे तसेच सी व्हिजिल या एप वरही तक्रार नोंदविता येणार आहे.नियमानुसार उमेदवार व पक्षांना प्रचार कार्यक्रमासाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे.हे इथं विशेष!