संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- राज्यात १० वी आणि १२ वीच्या परिक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण राज्यात “कॉपीमुक्त अभियान” राबविण्यात येणार आहे. या पार्श्व भूमीवरबारावी इयत्ता १२वी ला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान केंद्रावर व वर्गात मोबाईल, पेजर डिजीटल डायरी, मायक्रोफोन, स्मार्टवॉच यांसारखी दूरसंचार साधने व कॅल्क्युलेटर आणण्यास व स्वतःजवळ बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर परिक्षेसाठी परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नसल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विनय चव्हाण व केन्द्र संचालक व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ सुधीर अग्रवाल यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकातून माहिती दिली आहे.
येत्या २१ फेब्रुवारी ते २१ एप्रिल पर्यन्त इयत्ता १२ वी ची परीक्षा होणार आहे. परीक्षा दोन सत्रात होणार असून पहिले सत्र सकाळी १० .३० वाजता तर दुसरे सत्र दुपारी २.५० सुरू होणार असून विद्यार्थ्यांनी या वेळात महाविद्यालयात उपस्थित राहावे, व कोणत्याही गैर मार्गाचा अवलंब करू नये परीक्षे दरम्यान शिक्षकांनी देखील मोबाईल वापरू नये,असे आव्हान करण्यात आले आहे.सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२ वी ला ६५१ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत.
@ फाईल फोटो