– खासदार क्रीडा महोत्सव राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये शमा क्लबच्या मो. आसीफ, गुलखान आणि राय क्लबच्या सलीम रहमान, राहुल वर्मा यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंना मात देत विजयी सुरुवात केली. खदान येथील सभागृहात गुरुवारी (ता.२३) स्पर्धेचा शुभारंभ झाला.
राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी भाजपा मध्य नागपूरचे अध्यक्ष श्रीकांत आगलावे, खासदार क्रीडा महोत्सवाचे सहसंयोजक नागेश सहारे, स्पर्धेचे समन्वयक ॲड. संजय बालपांडे, भाजपा महामंत्री अमोल कोल्हे, स्पर्धेचे मुख्य पंच मनोहर वानखेडे, सहमुख्य पंच एन.के. बक्षी, नवल मेश्राम, चमन प्रजापती आदी उपस्थित होते.
स्पर्धेमध्ये एकूण १७६ स्पर्धकांनी पुरुष एकेरीकरिता द केली. ज्येष्ठांच्या स्पर्धेकरिता ४४ सहभागींनी आणि महिला एकेरीकरिता ३२ सहभागींनी नोंद केली.
स्पर्धेमध्ये शमा क्लबच्या मो. आसीफ ने आरसीए क्लबच्या सौरभ सयोदेचा २५-०, २५-० असा एकतर्फी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात राय क्लबच्या सलीम रहमान ने केकेएम च्या निशिकांत हेडाउला २५-६, २५-० ने मात दिली. राय क्लबच्या राहुल वर्माने केकेएमच्या राजू देवगडेचा २५-६, २५-६ ने पराभव केला तर राय च्या सयुध देशमुखला शमा क्लबच्या गुलखान कडून २५-०, २५-० ने पराभव स्वीकारावा लागला. अन्य सामन्यात डायमंड क्लबच्या इरशाद अहमद आणि कनिष्क क्लबच्या अमोल प्रधान यांच्या चुरशीची लढत झाली. पहिल्या सेटमध्ये २५-४ अशी आघाडी घेणाऱ्या अमोल प्रधानला दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये इरशाद अहमद ने २४-१२, २२-१८ ने नमवून विजय मिळविला.
निकाल
मो. आसीफ (शमा) मात सौरभ सयोदे (आरसीए) २५-०, २५-०
सलीम रहमान (राय) मात निशिकांत हेडाउ (केकेएम) २५-६, २५-०
दीपक गेडाम (एनकेएम) मात अरबाज कुरैशी (डायमंड) २५-१९, २५-१५
पवन बडगे (स्टार) मात किशोर सहारे (आरसीए) २५-०, २५-६
निलेश जांभुळकर (आरसीए) मात मुकूंद हेडाउ (ओम) २४-४, १९-१४
राजू भैसारे (एजीआरसी) मात आय.अहमद कालु (व्हीसीए) २१-१३, २०-०
आलोक रोडगे (कनिष्क) मात सुरज सहारे (आरसीए) १९-६, २२-१७
राहुल वर्मा (राय) मात राजू देवगडे (केकेएम) २५-६, २५-६
इरशाद अहमद (डायमंड) मात अमोल प्रधान (कनिष्क) ४-२५, २४-१२, २२-१८
गुलखान (शमा) मात सयुध देशमुख (राय) २५-०, २५-०
राकेश बारसे (व्हीबीएस) मात मुस्तफा बाम्बेवाला (राय) २५-०, २५-०