– अजित पवार यांनी केली रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना !
– आमदार देवेंद्र भुयार यांनी मानले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार !
मोर्शी :- महाराष्ट्र राज्यातील बारी समाजाच्या विवीध समस्या सोडविण्यासाठी त्यांना न्याय मिळून देण्यासाठी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी १३ आक्टोंबर २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन महाराष्ट्र बारी समज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी करून १४ डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बारी समाजाच्या मागण्या रेटून धरून १२ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनामध्ये बारी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी लक्षवेधी मांडून शासनाचे लक्ष वेधून बारी समाजाला न्याय देण्याची मागणी करण्यात आली होती. आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दाखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प २०२४ मध्ये बारी समाजाच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक विकासासाठी श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा केल्यामुळे बारी समाजाला न्याय मिळाला असल्याचे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी केले.
बारी समाज जवळपास स्वातंत्र्यपुर्व कालापासून संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. बारी समाज नागपूर मॉर्फत अनेक कार्यक्रम दरवर्षी राबविल्या जातात. महाराष्ट्रात इतर
समाजाचे अनेक विकास महामंडळ स्थापन झालेले आहेत. परंतु १९४७ पासुन बारी समाजाचे कुठलेही शासन निर्मीत विकास महामंडळ नाही. त्यामुळे आर्थीक विकासापासुन संपुर्ण बारी समाज वंचीत राहत आहे. तसेच बारी समाजातील बहुतांश लोक पान शेती, पान व्यवसाय व पिपरी (औषधी युक्त साधन) व्यवसायावर अवलंबुन आहेत. बारी समाज विकास महामंडळ नसल्याकारणाने हे व्यवसाय लुप्त होत चालले आहेत विकास साध्य करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी बारी समाजाच्या हितासाठी त्यांना न्याय मुळऊन देण्यासाठी विविध मुद्दे शासन दरबारी रेटून बारी समाज आर्थीकदृष्ट्या दुर्बळ असल्यामुळे त्यांना आर्थीकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी. शैक्षणीक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी व शैक्षणीक प्रगती साध्य करण्यासाठी. बारी समाज सामाजीक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी. बारी समाजातील होतकरु लोकांना उद्योग धंदे करण्यासाठी आर्थीक सहाय्य उपलब्ध करुन देणे, विद्याथांना शहरात शैक्षणीक व्यवस्था करण्यासाठी, बसस्तीगृह निर्माण करणे. बारी समाज अत्यंत मागासवर्गीय असल्यामुळे त्यांच्या सर्वांगीन विकासासाठी, तसेच शैक्षणीक, सामाजीक, आर्थीक विकासासाठी महाराष्ट्र समाज विकासा महामंडळ स्थापन करणे अत्यावश्यक असल्याचे शासनाच्या लक्षात आणून दिल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये पान पिंपरी आणि मुसळीचे उत्पादन करणाऱ्या बारी समाजाच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक विकासासाठी श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा केल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.