आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिन संपन्न

नागपूर :- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्या उपस्थितीत पूर्व नागपुरातील आंबेडकर चौक वर्धमाननगर येथे 15 ऑगष्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडा वंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी माजी नगरसेवक  यशवंत मेश्राम, माजी नगरसेवक पुरूषोत्तम लोणारे, माजी नगरसेविका नयना झाडे, ब्लॉक अध्यक्ष राजेश पौनीकर,  ज्ञानेश्वर ठाकरे, पूर्व नागपूर ब्लॉक कॉंग्रेस कमेटीचे समन्वयक राजेश डांगे, राजीव गांधी विचार मोर्चाचे अध्यक्ष अनिल पांडे, नागपूर शहर काँग्रेस कमेटीचे सहसचिव परमेश्वर राऊत हे प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी ॲड. अभिजित वंजारी यांनी स्वातंत्र्य संग्रामात शहीद झालेल्या सर्व हुतात्म्यांना व क्रांतीकारांना आदरांजली अर्पण केली व त्यांच्या पराक्रमाचा तसेच बलिदानाचा इतिहास जनतेसमोर मांडला. भारतावर अनेक परकीयांनी आक्रमण करून आपल्या देशातील संपत्तीची लुट केली. ब्रिटीशांनी सर्वात जास्त लूट करून देशात आपापसात भांडणे लावण्याचे काम केले. सर्वानी सर्वधर्म समभाव, समता व बंधूतेने राहण्याकरिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला आदर्श राज्यघटना दिली. राज्यात व देशात दिवसेंदिवस राजकारण फार खालच्या स्तरावर जात आहे. भाजपाचे सरकार इंडीच्या जोरावर सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग करीत आहे.

संसदेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपुरच्या ज्वलंत प्रश्नावर चर्चा केली नाही. देशात महागाई व बेरोजगारी दिवसेंदिवस वाढतच आहे. सरकारी कामे शासन कंत्राटी पध्दतीने करत असल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना स्थायी नोकरीच्या संधी उपलब्ध होत नाही. भाजप सरकारच्या काळात राज्यातील व देशातील निवडणुका सुचारु पध्दतीने होईल की नाही, यात शंका आहे. असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन परमेश्वर राऊत यांनी केले तर आभार कृणाल चौधरी यांनी मानले. या कार्यक्रमाला मनपाचे माजी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, माजी नगरसेवक नितीन साठवणे, मुजिब वारसी, राकेश कनोजे, मिलिंद दुपारे, भास्कर चाफले, केशव घावडे, प्रशांत पाटील, शरिफ दिवाण, मनोज नौकरकर, राजू भेंडे, बाबु जिनानी, मनोहर जुमानी, मुकेश पौनीकर, धनराज अतकरी, केवल गुमगांवकर, विजय बोरकर, विष्णु शर्मा, धिरज सिंगारे, पप्पु चौरसिया, शैलेश कांबळे, कुणाल चौधरी, अजय जानवे, मुश्ताक शेख, पंकज चाफले, बेबिनंदा गाडेकर, नूतन झोड, कैलाश मैश्राम, दिपक राऊत, योगेश कुंजलकर, अनिल हजारे, विलास मेश्राम, चढ्ढाजी, मृणाल हेडाऊ, चंदाभाऊ राऊत, ऋतिका डाफ, अक्षय घाटोळे, ऋषम धुळे, प्रज्वल शनिवारे, राजू मोहोड, अनिल बारापात्रे, राजु देशप्रतार, राजेश रखेजा, राजू कुथे, चारूलताताई भट, नितीन रामटेककर, दिलीप गुप्ता, राजेश खानोरकर, नंदा कळंबे, सुकेश चिचघरे, अर्चना सिडाम, चंदू वनवे, मुकेश गजभिये, सतिश पारेख, शुभम जांगळे, रानी राऊत-अंबादे, नागदेवेताई, तुघलक अंसारी, नारद भाटेकर, शुभम रेवतकर व पूर्व नागपूर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महावितरणमध्ये सद्भावना दिवस साजरा

Fri Aug 18 , 2023
नागपूर :- भारताचे दिवंगत पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती महावितरण कार्यालयात सद्भावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी महावितरणचे प्रादेशिक संचालक  सुहास रंगारी आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता  दिलीप दोडके यांनी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सद्भावना दिवसानिमित्त प्रतिज्ञा घेतली. याप्रसंगी अधीक्षक अभियंता सर्वश्री हरीश गजबे, राजेश नाईक, मंगेश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com