अमरदिप बडगे, प्रतिनिधी
अनेक ठिकाणी होते कार्यक्रम ; गोंदिया शहर झाले होते होर्डिंग मय…
गोंदिया :- राज्यस्व आणि पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री महाराष्ट्र शासन राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गोंदिया जिल्हा पुन्हा एकदा दौरा रद्द करण्यात आले आहे. या अगोदर ही ८ ऑक्टोंबर ला राधाकृष्ण विखे पाटील हे गोंदिया दौऱ्यावर येणार होते. मात्र तेव्हा ही अँड वेळेवर त्यांच्या दौरा रद्द करण्यात आला होता. आता पुन्हा राधाकृष्ण विखे पाटील हे गोंदिया दौऱ्यावर येत असल्याने वेळेवर त्यांच्या गोंदिया दौरा रद्द करण्यात आला.
असून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गोंदिया दौऱ्यावर येत असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी मंत्री मोहदय येत असल्याने संपुर्ण गोंदिया शहरात मोठ्या प्रमाणात त्यांच्या स्वागतासाठी होर्डिंग लावण्यात आले. आहे. संपूर्ण गोंदिया शहर होर्डिंग मय झाले. असून अनेक ठिकाणी त्यांच्या स्वागतीसाठी जल्लोष तयारी करण्यात आली होती. मात्र त्यांच्या दौरा रद्द झाल्यामुळे कुठेतरी त्यांच्या चाहत्या मध्ये निराशा पाहायला मिळत आहे.