राज्यातील मोठ्या शहरांमधील शासकीय रुग्णालयांतील सोयी – सुविधांचा आढावा घेणार – मंत्री उदय सामंत

मुंबई :- नगर विकास विभागाअंतर्गत मोठ्या शहरांमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून रूग्णालये कार्यान्वित आहेत. रुग्णालयातील जनरेटरची व्यवस्था, विविध आजारांचे निदान करणारी तपासणी यंत्रणा आदींबाबत मोठ्या शहरांमध्ये असलेल्या शासकीय रूग्णालयांचा आढावा घेण्यात येईल. या आढाव्यामध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

भांडूप येथील सुषमा स्वराज प्रसुतिगृहाच्या प्रकरणाबाबत सदस्य रमेश कोरगांवकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधी सुचनेच्या चर्चेत सदस्य रोहित पवार यांनीही भाग घेतला.

मंत्री सामंत म्हणाले की, बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारित भांडूप (पश्चिम) येथे सावित्रीबाई फुले उपनगरीय प्रसुतिगृहाची जानेवारी 2024 पासून दुरूस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रसुतीगृहात नोंदणी केलेल्या रूग्णांना जवळील सुषमा स्वराज प्रसुतीगृहात आवश्यक सेवा देण्यात येत आहे. या रूग्णालयात झालेल्या माता व बाल मृत्यूप्रकरणी नविन समिती स्थापन करून याबाबत चौकशी अहवाल मागविण्यात येईल. या अहवालानंतर उचित कार्यवाही करण्यात येईल. या प्रकरणात दुय्यम अभियंता, सहायक अभियंता यांची विभागीय चौकशी करण्यात येत असून तर स्त्रीरोग तज्ज्ञ यांचे कंत्राटाचे नुतनीकरण करण्यात आले नाही. या रूग्णालयातच नवजात बालकांच्या उपचारासाठी असलेल्या 20 खाटा ठेवण्यात येतील. तसेच काम पूर्ण करून सावित्रीबाई फुले उपनगरीय प्रसुतिगृह सुरू करण्यात येईल, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मागासवर्गीय मुला-मुलींना शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश

Thu Jul 11 , 2024
यवतमाळ :- सामाजिक न्याय विभागाच्यावतीने मागासवर्गीय व आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृहे चालविण्यात येत आहे. वसतिगृह प्रवेशाची प्रक्रिया सुरु झाली असून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासप्रवर्ग, आर्थिक मागास प्रवर्गातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा मोफत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com