यवतमाळ :-महाराष्ट्र दूध उत्पादक विक्रेता सघटनेकडून दूध भाव वाढ करण्यात आली हि दर वाढ १ ऑगस्ट २०२३ पासून करण्यात आली आहे दूध उत्पादकांना नुकत्याच घेतलेल्या सभेत, ६४ रुपये विक्री करण्याचे ठरविण्यात आले हि सभा श्री कृष्ण मंदिर टिळक वाडी यवतमाळ येथे सभेत जाहीर करण्यात आली या दूध उत्पादक संघटनेच्या अध्यक्ष स्थानी रामेश्वर यादव हे होते तर प्रमुख प्रकाश लंगोटे, वेंकटराव कालोकर, ओंकार चेके यांच्या उपस्थिती या सभेचे आयोजन करण्यात आले सध्या दूध उत्पादकांना गायी म्हशी पाळणे कठीण झाले आहे ढेप,सुग्रास वैरण घेणे कठीण झाले आहे चारा मिळने दुरापास्त झाले आहे, गायी म्हशीच्या किमती गगनाला भिडल्या यातच दुधाचे भाव कमी असल्याने दूध उत्पादक मेटाकुटीस आला असल्याने तातडीने दूध भाव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला तर ग्राहकांनी हि सतर्कता बाळगून दूध घ्यावे दुधाचे उत्पादन फारच अत्यल्प असून भेसळ कुत्रीम दुधाची विक्री कमी दरात मोठ्या प्रमाणात होत आहे अनेक ठिकाणी पावडरचे दूध,सोयाबीन चे दूध व केमिकलचे दूध आणि दही शहरात मोठ्या प्रमाणात विकल्या जात असल्याचे दिसून येत आहे अनेक ठिकाणी अल्प दरात दूध विकत घेताना सतर्कता बाळगावी तसेच दूधाचे वय 24 तासाचे आहे मात्र अनेक ठिकाणी ते दूध आठ दिवस एक महिना दूध जसेच्या तसे कसे राहू शकते याचा विचार करून ग्राहकांनी दुधाची खरेदी करावी जेणे करून त्याचे विपरीत परिणाम होणार नाही.असे आवाहन महाराष्ट्र दूध उत्पादक संघटनेने केले आहे दूध डेरी धारक व ग्राहकांनी याची नोंद घ्यावी.तर कुत्रीम दुधाच्या विक्रीवर दुग्ध विकास अधिकारी यांनी ठिक ठिकाणी दुग्ध जन्य पदार्थ व दुधाची कमी दरात भेसळ युक्त पदार्थाची तातडीने तपासणी करून दोषी आढळल्यास त्यांचा परवाना कायम सवरुपी बंद करण्यात यावा अशी मागणी संघटनेच्या वतीने प्रकाश अवथळे,सतीश झांबरे,पवन झांबरे,प्रभाकर डोळे, जयवतराव घोडे, अमोल झांबरे,हरिपाल झांबरे,गजु डोळे,माणिक झांबरे,मनोहर डोळे, स्वप्नील घाटोळ,संतोष घाटोळ,सुधाकर साठे,संदीप चेके अनिल पवार,विनोद चेके यांच्या वतीने करण्यात येत आहे याची त्वरित दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.