के.टी. नगर आरोग्य केंद्रात सुरु होणार ‘मेट्रोपोलीटन सर्वेलन्स यूनिट’

– मनपा, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि आरोग्य व कुटूंब कल्याण विभाग यांच्यात सामंजस्य करार

नागपूर :- भारत सरकारच्या आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाद्वारे महाराष्ट्र राज्यासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी) शाखा आणि मेट्रोपोलीटन सर्वेलन्स यूनिट (एमएसयू) नागपूर महानगरपालिकेमध्ये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मनपाच्या के.टी. नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीमध्ये मेट्रोपोलीटन सर्वेलन्स यूनिट (एमएसयू) सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली आहे.

यासंदर्भात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी) दिल्ली, आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, मुंबई आणि नागपूर महानगरपालिका यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. मनपामध्ये एमएसयू सुरू करण्याच्या अनुषंगाने आरोग्य व कुटूंब कल्याण विभाग दिल्लीचे संयुक्त सचिव घुलाम मुस्तफा यांच्या अध्यक्षतेतील चमूने ८ व ९ डिसेंबर २०२४ रोजी नागपूरला भेट दिली होती. या चमूने प्रस्तावित एमएसयू करिता मनपाच्या के.टी. नगर आरोग्य केंद्राच्या इमारतीला भेट देउन पाहणी देखील केली होती.

आरोग्य व कुटूंब कल्याण विभाग दिल्लीचे संयुक्त सचिव घुलाम मुस्तफा यांच्या अध्यक्षतेतील चमूने अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांची भेट घेउन त्यांच्याशी मेट्रोपोलीटन सर्वेलन्स यूनिट (एमएसयू) बाबत चर्चा केली. यावेळी एपीएचओ नागपूर तथा राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रच्या नोडल अधिकारी डॉ. आराधना भार्गव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच विद्युत आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मेट्रोपोलीटन सर्वेलन्स यूनिट (एमएसयू) चा मुख्य उद्देश

१) आयडीएसपी अंतर्गत सूचीबद्ध आजारांचे सर्वेक्षण, तसेच सर्वेक्षण कामांचे बळकटीकरण करणे. (सूचीबद्ध आजार- Anthrax, Chicken Pox, Chikungunya, Dengue, Diphtheria, Human Rabies, Leptospirosis, Malaria, Measles, Meningitis, Mumps, Pertussis, Scrub Typhus, Typhus, Ebola Virus disease, Zika Virus, Nipah, Yellow Fever, Brucellosis etc.)

२) मेट्रोपोलीटन सर्वेलन्स यूनिट (एमएसयू) संसर्गजन्य रोगांच्या उद्रेकासाठी अलर्ट ओळखेल आणि प्रतिसादासाठी तांत्रिक मार्गदर्शन करेल.

३) मेट्रोपोलीटन सर्वेलन्स यूनिट (एमएसयू) सुरु झाल्यास त्याद्वारे विविध साथीच्या आजारांचे रोग सर्वेक्षण आणि त्यावर त्वरित उपाययोजना करणे साध्य होईल.

४) याकरिता केंद्रीय स्तरावरून निधी मंजूर करण्यात आलेला आहे. सुसज्य अशी प्रयोगशाळा येथे स्थापन करण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपाच्या दिव्यांग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Thu Dec 12 , 2024
– दिव्यांग बांधवांनी घेतला लाभ : दरमहा ५०० रुपये मिळणार निर्वाह भत्ता नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातर्फे आयोजित दिव्यांग शिबिराला शहरातील नागरिकांनी बुधवारी (ता.११) उत्स्फूर्त प्रदिसाद दर्शविला. नागपूर महानगरपालिकेतर्फे दिव्यांगाच्या कल्याणाकरिता विविध योजना राबविल्या जातात. या पार्श्वभूमीवर मतिमंद घटकातील स्वमग्नता, बौद्धीक दिव्यांगता, अपंगत्व, मेंदूचा पक्षाघात, बहुदिव्यांगता अशा पाच प्रवर्गातील दिव्यांगाना ५०० रुपये निर्वाह भत्ता महानगरपालिकेकडून दिला जाणार आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com